नांदेड शहराला आजपासून तीन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:17 AM2019-04-25T00:17:24+5:302019-04-25T00:17:32+5:30

विष्णूपुरी प्रकल्पात दिवसेंदिवस होणारी पाण्याची घट पाहता नांदेड शहराला २५ एप्रिलपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

now water will get every three day in Nanded city | नांदेड शहराला आजपासून तीन दिवसांआड पाणी

नांदेड शहराला आजपासून तीन दिवसांआड पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देविष्णूपुरी : दरदिवशी सुरु आहे ०.३२ दलघमी पाण्याचा उपसा

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात दिवसेंदिवस होणारी पाण्याची घट पाहता नांदेड शहराला २५ एप्रिलपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना पाण्यासाठी आता दोनऐवजी तीन दिवसांची वाट पहावी लागणार आहे.
विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा, औद्योगिक वापर यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून दररोज ०.३२ दलघमी पाणी उपसले जात आहे. या सर्व पाणी उपशामुळे विष्णूपुरीतील उपलब्ध जलसाठा पाहता शहराला मे अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे २५ एप्रिलपासून नांदेड शहरात २ दिवसांऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी घेतला आहे.
महापालिकेने शहरासाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३२ दलघमी पाणी राखीव केले होते. शहराला दरवर्षी ३२.४० दलघमी पाणी आवश्यक आहे. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात ९.४५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. शहराला दरमहा २.७० दलघमी पाणी आवश्यक आहे. मात्र प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेला उपसा यामुळे पाणी झपाट्याने कमी होत आहे. यावर आता उपाययोजना आवश्यक आहेत.
विष्णूपुरीसह नांदेड शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारेही पाणी दिले जाते. इसापूर प्रकल्पातून आतापर्यंत तीन पाणीपाळ्या घेतल्या आहेत. पहिली पाळी २० डिसेंबर २०१८ रोजी, दुसरी १ मार्च २०१९, तिसरी ३ मार्च आणि आता चौथी पाणीपाळी २५ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविली आज बैठक
विष्णूपुरीतील झपाट्याने कमी होत असलेला पाणी उपसा पाहता नांदेड शहराचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. मे अखेरपर्यंत कसेबसे पाणी उपलब्ध होईल. पण पावसाळा लांबला तर काय? हा प्रश्नही पुढे आला आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापालिकेसह पाटबंधारे विभाग, महावितरण, पोलीस आदी विभागांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत जिल्हा प्रशासनाने विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकांचाही आढावा घेतला जाणार आहे.
इसापूरचे पाणी पोहोचणार
पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी सांगवी बंधाºयात इसापूर प्रकल्पाचे पाणी २४ एप्रिल रोजी सोडण्यात आले आहे. हे पाणी २५ एप्रिल रोजी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे. या पाण्यातून उत्तर नांदेडची जवळपास २५ दिवसांची तहान भागणार आहे. यामुळे विष्णूपुरीतून उपसा कमी होणार आहे.

Web Title: now water will get every three day in Nanded city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.