जिल्ह्यात कोरोनाबळींचा आकडा आला ३ वर, नवे १६२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:14+5:302021-05-21T04:19:14+5:30
गुरूवारी प्राप्त झालेल्या अहवालात आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा हद्दीत ५४, नांदेड ग्रामीण ६, अर्धापूर २, किनवट ६, बिलोली ४, ...
गुरूवारी प्राप्त झालेल्या अहवालात आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा हद्दीत ५४, नांदेड ग्रामीण ६, अर्धापूर २, किनवट ६, बिलोली ४, देगलूर ४, धर्माबाद २, हदगाव ४, लोहा २, मुदखेड २, मुखेड ६, हिंगोली ५, परभणी ३, यवतमाळ ३, बीड २ आणि बोधन येथील १ रूग्ण बाधित आढळला.
ॲन्टीजेन तपासणीत मनपा हद्दीत ७, अर्धापूर २, भोकर ३, देगलूर ४, धर्माबाद २, हदगाव १, कंधार १, किनवट ६, उमरी ४, परभणी १ आणि दिल्लीतील २ रूग्णही बाधित आढळले आहेत.
गुरूवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये मनपाअंतर्गत २६६, विष्णूपुरी वैद्यकीय महाविद्यालय १०, जिल्हा रूग्णालय कोविड हॉस्पीटल ७, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय ३, नायगाव २, देगलूर ६, मुखेड३०, मुदखेड १५, बारड ३, धर्माबाद १, माहूर ११, किनवट ६, अर्धापूर १४, बिलोली १, लोहा ३, भोकर ७, उमरी ३, मालेगाव १ आणि खाजगी रूग्णालयातील ७६ रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या १ हजार ८४८ रूग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यातील ८५ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. विष्णूपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रूग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये ५६, जिल्हा रूग्णालय कोविड हॉस्पीटल नवी इमारत ५५, बारड कोविड सेंटर ११, किनवट ४३, देगलूर २१, भोकर १, नायगाव ५, उमरी १२, माहूर १५, हदगाव ९, लोहा १३, धर्माबाद ३२, मुदखेड १०, अर्धापूर ५, बिलोली ३०, हिमायतनगर ४, एनआरआय कोविड सेंटर नांदेड १४, मांडवी २, भक्ती जम्बो कोविड सेंटर ७ आणि खाजगी रूग्णालयात ३२९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मनपाअंतर्गत गृहविलगीकरणात ८८ आणि जिल्ह्यांतर्गत १ हजार १० रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३२ टक्क्यांवर पोहोचले आहे.