जिल्ह्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढली, मृत्यूनेही गाठला उच्चांकी आकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:01+5:302021-03-29T04:12:01+5:30
जिल्ह्यात १८ जणांचा मृत्यू ही बाब चिंताजनक आहे. त्यात विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात ९, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये ...
जिल्ह्यात १८ जणांचा मृत्यू ही बाब चिंताजनक आहे. त्यात विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात ९, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये ५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात १, हदगाव कोविड रुग्णालयात २ आणि खाजगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मयतामध्ये नांदेड शहरातील चिखलवाडी येथील ७४ वर्षीय पुरुष, सिद्धीविनायक अपार्टमेंटमधील ५८ वर्षीय महिला, लोहा तालुक्यातील चितळी येथील ६० वर्षीय महिला, इंदिरानगर येथील ५५ वर्षीय पुरुष, सिडकोतील २५ वर्षीय पुरुष, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, तरोडा बु. येथील ७६ वर्षीय पुरुष, बळीरामपूर येथील ५०वर्षीय पुरुष, होळी येथील ८२ वर्षीय पुरुष, हिंगोलीनाका येथील २९ वर्षीय पुरुष, भोकर येथील ५२ वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर येथील ६५ वर्षीय महिला, भगतसिंह रोड येथील ८५वर्षीय पुरुष, गुरुद्वारा गेट नं. ४ येथील ५० वर्षीय महिला, दिलीपसिंह कॉलनी येथील ७० वर्षीय पुरुष, हदगाव तालुक्यातील पाथरड येथील ६० वर्षीय आणि तामसा येथील ५० वर्षीय महिला तर पूर्णा रोडवरील ४८ वर्षाचा मयतामध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात ७५५ कोरोना रुग्ण उपचारानंतर रविवारी बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यात विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १०, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील ५५९, किनवट कोविड रुग्णालयातून ३, कंधार ९, धर्माबाद ९, देगलूर ४७, मुखेड २२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पील नांदेड १९, हदगाव ७, बिलोली १२, भोकर ५, माहूर २०, मांडवी १ आणि खाजगी रुग्णालयातून ४० रुग्णांचा त्यात समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या ९ हजार ६७० रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यातील १०८ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये विष्णूपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २९०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये ८६, जिल्हा कोविड रुग्णालय नवी इमारत मध्ये ९२, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात ११९, किनवट कोविड रुग्णालयात १०८, मुखेड १६३, देगलूर २८, देगलूर जैनब हॉस्पीटल ५२, बिलोली १४४, नायगाव ६३, उमरी ४४, माहूर १७, भोकर २, हदगाव ३३, हदगाव कोविड केअर सेंटर ५३, लोहा ९७, कंधार १८, महसूल कोविड केअर सेंटर ९७, हिमायतनगर ७, धर्माबाद ६७, मुदखेड ४६, अर्धापूर २४, बारड १७, मांडवी १८, मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात ६ हजार २९, तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात १ हजार ४७३, खाजगी रुग्णालयात ४८२ आणि लातूर येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९ आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात १० रुग्णावर उपचार सुरू आहेत.