तीन दिवसांच्या क्वारंटाईनसाठी परिचारिका संघटनेचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:09+5:302021-04-08T04:18:09+5:30
नांदेडच्या विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये परिचारिका वर्ग जीवाची पर्वा न ...
नांदेडच्या विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये परिचारिका वर्ग जीवाची पर्वा न बाळगता सेवा दिली. त्यात आपल्या कुटुंबातील लहान मुलं, वयोवृध आई -वडील यांचा जराही विचार न करता आपली भूमिका बजावली आहे. परंतु, शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून परिचारिकांच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात येत असल्याने परिचारिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कोविडमध्ये आठवडाभर ड्युटी करून तीन दिवस मिळनारी क्वारंटाईन अचानक बंद करण्यात आले आहे. यापूर्वी हा कालावधीत सात दिवसांचा होता. परंतु, तीन दिवसांवरही परिचारिकांनी समाधान मानले. तोही कालावधी बंद करण्यात आल्याने परिचारिकांमध्ये नाराजी पसरली आहे. परिचारिकाच्या कुटुंबातील लहान मुलं, वयस्कर आई -वडील, शेजारी व तसेच संपर्कात येणाऱ्यांना कोरोना संसर्ग होत असल्याच्या धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने काही मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोविड वॉर्डमध्ये सात दिवस ड्युटी केल्यास तीन दिवस क्वारंटाईन सुट्टी देण्यात यावी, कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाबाबत उपाय योजना करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.या निवेदनावर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे कोषाध्यक्ष रवि शिसोदे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.