अंगणवाड्यांनी गाजविला पोषण महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:46 AM2018-10-03T00:46:19+5:302018-10-03T00:46:44+5:30

तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा योजनेची ३२० अंगणवाडी केंद्राने सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात आली. एक महिना विविध विभागाच्या सहकायार्ने ग्रामीण भागातील वातावरण उपक्रममय झाल्याचे चित्र होते. कुषोषणमुक्तीचे स्वप्न पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे.

Nutrition month sung by the anganwadi | अंगणवाड्यांनी गाजविला पोषण महिना

अंगणवाड्यांनी गाजविला पोषण महिना

Next
ठळक मुद्देकंधार तालुक्याचे चित्र : आता कुपोषणमुक्तीचे स्वप्न पूर्ण होणार का, याची तालुकावासियांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा योजनेची ३२० अंगणवाडी केंद्राने सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात आली. एक महिना विविध विभागाच्या सहकायार्ने ग्रामीण भागातील वातावरण उपक्रममय झाल्याचे चित्र होते. कुषोषणमुक्तीचे स्वप्न पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे.
गरोदर महिलांची काळजी, प्रसूतीनंतर तात्काळ आणि सहा महिन्या पर्यंत स्तनपान, सहा महिन्यानंतर बालकांना वरचा आहार सुरू करणे,बालकांचे वृद्धी संनियंत्रण, वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता, मुंलीचे शिक्षण, पोषण आहार व विवाहाचे योग्य वय,आरोग्यदायी आणि सूक्ष्म पोषणमूल्य असलेल्या आहाराचे सेवण आदी संकल्पनेवर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम व उपक्रम राबवून पोषणाची लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्याप्रकारे करण्यात आला. प्रभातफेरी, बालपंगत, विशेष ग्रामसभा,पोषण विषयावर शाळेत चित्रफित, योग्य आहाराचे सेवन मार्गदर्शन,बचत गटाच्या बैठका, अंगणवाडीत वजन महोत्सव, ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण दिवस, गणेशोत्सव काळात योजनेची प्रसिद्धी, योगा आयोजन, हात धूणे उपक्रम,चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजन, परसबाग निर्माण, आरोग्य तपासणी, आदी उपक्रम नेटाने राबविण्यात आले.अखेर अहवाल संकलन करून २ आॅक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात ग्रामसभेत अभियानाची माहिती देण्यात आली आणि या पोषण महिन्याचा समारोप करण्यात आला.
यशस्वी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी कैलास बळवंत, पर्यवेक्षिका सुशीला घुगे, उषा चव्हाण, विजया नागरगोजे, निर्मला सर्कलवाड,सुचिता सुर्वे, आशा धोंडगे, चंद्रकला पोले,गंगासागर नरवाडे,जि.प.व पं.स.सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, डॉक्टर, ग्रामस्थ, मदतनीस, कार्यकर्ती आदीनी अथक प्रयत्न केले.
वातावरण महिनाभरात कुपोषणमुक्तीसाठी पोषक करण्यात आले होते. हे आगामी काळात असेच ठेवून तालुका कुपोषणमुक्त होईल अशी आशा आहे.यापूर्वी अनेक उपक्रम राबवून सुद्धा कुपोषणमुक्ती झाली नाही. आता तरी व्हावी अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
 

  • तालुक्यात राष्ट्रीय पोषण अभियान या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना निश्चित केलेल्या उद्दिष्टाना साध्य करण्याचा प्रयत्न विविध उपक्रमातून करण्यात आला. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकातील खूजे/बूटकेपणा व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे,सहा महिने ते एकोणसाठ महिने वयोगटातील बालकामधील रक्ताल्पताचे प्रमाण कमी करणे, १५ वर्षे ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिला मधील रक्ताल्पता कमी करणे, जन्मता कमी वजन असणाऱ्या बालकाचे प्रमाण कमी करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना साजरा करण्यात आला.

Web Title: Nutrition month sung by the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.