ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीतील दोषांबाबत आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:48+5:302020-12-11T04:44:48+5:30

बेम्बरा येथील नंदकुमार पाटील यांनी सांगितले की,त्यांच्या गावामध्ये मतदार एका वॉर्डामध्ये राहत असेल तर त्याचे नाव दुसऱ्या वॉर्डामध्ये समाविष्ट ...

Objection to the defects in the draft voter list of the Gram Panchayat | ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीतील दोषांबाबत आक्षेप

ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीतील दोषांबाबत आक्षेप

Next

बेम्बरा येथील नंदकुमार पाटील यांनी सांगितले की,त्यांच्या गावामध्ये मतदार एका वॉर्डामध्ये राहत असेल तर त्याचे नाव दुसऱ्या वॉर्डामध्ये समाविष्ट आहे. एकाच कुटुंबातील काही सदस्य एका वॉर्डात तर अन्य सदस्य दुसऱ्या वॉर्डात असे प्रकार आढळून आले आहेत. वॉर्ड रचना, तेथील सदस्याचे आरक्षण याचा विचार न करता प्रारूप मतदार यादी तयार केली असल्याचे पाटील म्हणाले. निवडणूक सोयीस्कर होण्यासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरून मतदार यादी तयार झाल्याचे स्पष्ट आरोप आक्षेपामध्ये घेण्यात आला आहे.

जवळपास ७४ ग्रामपंचायतीच्या मतदार यादीबद्दल निवडणूक शाखेकडे आक्षेप नोंदविण्यात आल्याचे निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार रामराव पंगे यांनी सांगितले. या सर्व आक्षेपांची सुनावणी सध्या चालू असून आक्षेपांचे निराकरण झाल्यानंतर १ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Objection to the defects in the draft voter list of the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.