धर्माबादेत नावाने फेरफार करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारीकडून अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:15 AM2020-12-08T04:15:18+5:302020-12-08T04:15:18+5:30
तहसीलदार यांचे दुर्लक्ष धर्माबाद : वारसा, कौटुंबिक वाटणी पत्र असलेले सातबारा, नावाने फेरफार करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी हे सहा-सहा ...
तहसीलदार यांचे दुर्लक्ष
धर्माबाद : वारसा, कौटुंबिक वाटणी पत्र असलेले सातबारा, नावाने फेरफार करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी हे सहा-सहा महिने करीत नसल्याने शेतकरी हेलपाटे मारुन परेशान असून शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
धर्माबाद तालुक्यात तीन महसूल मंडल असून सोळा तलाठी सज्जे आहेत. सध्या विविध प्रकारचे नावाने सातबारा करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. आई-वडिलांच्या नावाने असलेली जमीन मुलांच्या नावाने फेरफार करणे, भावांच्या नावाने असलेली जमीन भावाच्या नावाने फेरफार करणे असे वारसा व कौटुंबिक वाटणी करून घेण्यासाठी शेतकरी तलाठ्याकडे फाईली टाकलेले आहेत. सहा-सहा महिने झाले फाईली टाकून तलाठी, मंडल अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे फेरफार करणे रेंगाळत पडले आहे. तलाठी म्हणतात, मंडल अधिकारी यांना भेटा, मंडल अधिकारी म्हणतात, माझ्याकडे फाईल आलीच नाही,या दोघात शेतकरी चकरा मारुन पायातील चप्पल झिजवत आहे. फेरफार करून घेण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी दहा,वीस हजार रुपयांची मागणी करत आहेत अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. जे गोरगरीब शेतकरी आहे,तो वीस हजार काेठून देणार ? नियमानुसार असलेल्या वारसा, कौटुंबिक वाटणीचे फेरफार करण्यास तलाठी, मंडल अधिकारी अडवणूक करत असल्याचे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. ज्यांनी पैसे दिले त्यांचे फेरफार करत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. कोणते तरी नियम दाखवून शेतकऱ्यांना हाकलून देतात. बहुतांश फेरफारचे फाईली तलाठ्याकडे पडून असून शेतकरी चकरा मारुन परेशान आहेत. या संदर्भात तहसीलदार यांना सांगून तक्रारी करुन तहसीलदार दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. बहुताश तलाठी, मंडल अधिकारी सज्जावर राहत नसून कुठे तरी दौरा दाखवून आठ आठ दिवस दांडी मारतात. काही शेतकऱ्यांना आपल्या गावाचा तलाठी, मंडल अधिकारी कोण आहेत, माहितीच नाही. वारसाचे व कौटुंबिक वाटणीचे फेरफार वेळेवर करावे अन्यथा तलाठी सज्जाना कुलूप ठोकू असा इशारा छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर यांनी केले आहे.
चिंदेल देवी उत्साहाचे आयोजन
हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील सवना ज. रस्त्यावरील माता चिंदल देवी मंदिरात ८ व ९अशा दोन दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सवना ज. रस्त्यावर असलेल्या संजय नरवाडे यांच्या शेतातील माता चिंदल देवी मंदिरात ८ डिसेंबर उत्सवास प्रारंभ होणार आहे. सकाळी पूजापाठ आरती सौ.लक्ष्मीबाई गंगाधर गड्डमवार यांच्या शुभ हस्ते होईल. त्यानंतर सायंकाळी ५वाजता हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरून नेहरूनगर ते चिंदलदेवी मंदिरापर्यंत आळन्का मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्रीला श्री पापय्या देवकर कोत्तलवाडी व देवकरीन मंडळी यांच्या कार्यक्रम संपन्न होणार आहे. ९ रोजी साकली मल्लना देवकर कुसलापूर यानाच्या हस्ते पाठ-पूजा आरती होईल. नंतर भजनी मंडळाच्या कार्यक्रमाने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे हस्ते होणार आहे