अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:18 AM2019-01-10T01:18:35+5:302019-01-10T01:19:51+5:30

येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत केलेल्या एकाच कामाची दोन वेळेस वेगवेगळे बिले उचलण्याचा प्रकार न्यायालयाचा निकालातून उघडकीस आला़

Officers will file criminal cases against them | अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देहदगाव न्यायालयाचा आदेशएकाच रस्त्याच्या कामासाठी दोन वेळेस उचलली बिले

हदगाव : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत केलेल्या एकाच कामाची दोन वेळेस वेगवेगळे बिले उचलण्याचा प्रकार न्यायालयाचा निकालातून उघडकीस आला़ निवघा ते वरूला मार्गाच्या कामाचा निधी हडप केल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद विभागातील सात अधिकारी व कर्मचाºयावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायालयाने दिले आहेत़
दरम्यान, यासंदर्भातील माहिती सामाजिक कार्यकर्ते जाकेर चाऊस यांनी शासकीय विश्राम ग्रहावर झालेल्या पत्र परिषदेत दिली़ ते म्हणाले की, निवघा ते वरूला मार्गाचा निधी हडप केल्याचे न्यायालयाच्या निकालावरून निष्पन्न झाले आहे़ जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्यावर तत्कालीन खासदार सुभाष वानखेडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने काम केल्याचे दाखवून लाखो रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे़ या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद विभागातील ७ अधिकारी व कर्मचाºयावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायालय हदगाव यांनी ७ जानेवारी रोजी दिले़
हदगाव तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते शे़जाकीर शे़समीर यांनी हदगाव न्यायालयात हे प्रकरण दाखल केले होते़ शे़ जाकीर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की २०१० ते २०१४ दरम्यान खर्च करण्यात आलेल्या खासदार निधीची चौकशी केल्यास करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येईल़ हा अर्ज आपण या पूर्वी जिल्हाधिकारी व बांधकाम विभागास दिला होता़ परंतु त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही़ सदर दोन्ही कामे ही हिमायतनगर येथील कंत्राटदार एस़ एस़ पळशीकर यांनी केले़ दोन्ही कामात एकाच पद्धतीने अपहार केल्याचे याचीकेत म्हटले आहे.
हदगांव तालुक्यातील निवघा (बा) ते वरूला या जोडरस्त्याचे काम २०१३ साली जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या हदगाव उपविभागामार्फत करण्यात आले. त्याच कामाला पुढे वाढवून आणखी एक किलोमिटर असे दोन किलोमीटर काम केल्याचे दाखवून ४० लाख कंत्राटदाराला देयक अदा केले. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांनी संगनमताने अपहार केल्याचे म्हटले आहे.
या निकालात एस.एस. तायडे. तत्कालीन कार्यकारी अभियंता जि. प. बांधकाम विभाग (उत्तर) नांदेड, पी.एस. मुंडे तत्कालीन उपअभियंता जि. प. बांधकाम उपविभाग हदगाव, व्ही.एल. कांबळे. तत्कालीन शाखा अभियंता जि. प. बांधकाम उपविभाग हदगाव, व्ही. आर. धारासूरकर. तत्कालीन कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग भोकर, डी. बी. नीळकंठ. तत्कालीन उपअभियंता सा. बां. उपविभाग हदगाव, एन. डी. बीराजदार, एम.एम. सय्यद. व जी.एम. बाचेवार तिघेही तत्कालीन शाखा अभियंता सा.बां. उपविभाग हदगाव या सात जणंवर हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी याचीकाकर्त्याच्या बाजूने विधिज्ञ ई. ई. कादरी यांनी काम पाहिले़
निवघा ते वरूला मार्गाचा निधी केला हडप

  • निवघा ते वरूला मार्गाचा निधी हडप केल्याचे न्यायालयाच्या निकालावरून निष्पन्न झाले आहे़ जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्यावर तत्कालीन खासदार सुभाष वानखेडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने काम केल्याचे दाखवून लाखो रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे़
  • हदगांव तालुक्यातील निवघा (बा) ते वरूला या जोडरस्त्याचे काम २०१३ साली जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या हदगाव उपविभागामार्फत करण्यात आले. त्याच कामाला पुढे वाढवून आणखी एक किलोमिटर असे दोन किलोमिटर काम केल्याचे दाखवून ४० लाख कंत्राटदाराला देयक अदा केले.
  • या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद विभागातील ७ अधिकारी व कर्मचाºयावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायालय हदगाव यांनी ७ जानेवारी रोजी दिले़ माहिती अधिकार कार्यकर्ते शे़ जाकीर शे़ समीर यांनी हदगाव न्यायालययात हे प्रकरण दाखल केले होते़
  • या निकालात एस.एस. तायडे. तत्कालीन कार्यकारी अभियंता जि. प. बांधकाम विभाग (उत्तर) नांदेड, पी.एस. मुंडे तत्कालीन उपअभियंता हदगाव, व्ही.एल. कांबळे. तत्कालीन शाखा अभियंता हदगाव, व्ही. आर. धारासूरकर. तत्कालीन कार्यकारी अभियंता भोकर, डी. बी. निळकंठ. तत्कालीन उपअभियंता हदगांव, एन. डी. बीराजदार, एम.एम. सय्यद. व जी.एम. बाचेवार या सात जणावर हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Officers will file criminal cases against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.