पोलिस असल्याची बतावणी करून दिवसाढवळ्या वृद्धाला लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 13:26 IST2020-11-30T13:26:27+5:302020-11-30T13:26:27+5:30
नांदेड येथील तरोडा भागात घडली घटना

पोलिस असल्याची बतावणी करून दिवसाढवळ्या वृद्धाला लुबाडले
नांदेड: पोलीस असल्याची बतावणी करून नांदेडमध्ये वृद्धाला लुटल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तरोडा भागात घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत मध्ये चित्रित झाला.
ओंकारेश्वर नगरमध्ये राहणारे गोपाळ कदम हे गृहस्थ तरोडा रोडवर दूध आणण्यासाठी गेले होते. दूध खरेदी केल्यानंतर नातवासह ते घरी परत येत होते. त्यावेळी दोघा अज्ञातांनी पोलीस असल्याचे सांगत त्यांची झडती घेतली. या दरम्यान, कदम यांच्याकडे असलेल्या 80 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेतल्या. तसेच गळ्यात सोन्याची चेन आहे का याचीही तपासणी केली. त्याचवेळी कदम यांच्या ओळखीचे मोरे हे तिथून जात असताना कदम यांनी त्यांना आवाज दिला. याच दरम्यान चोरट्यांनी तिथून पळ काढला.