Omicron Variant : ओमायक्राॅनची धास्ती; नांदेडकरांच्या लसीकरणासाठी रांगा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 04:54 PM2021-11-30T16:54:22+5:302021-11-30T16:57:41+5:30

Omicron Variant fear : प्रशासनाने हर घर दस्तक अभियान राबवून देखील नागरिक लसीकरणासाठी बाहेर आले नव्हते.

Omicron Variant fear; Nandedkars Queues for corona vaccination | Omicron Variant : ओमायक्राॅनची धास्ती; नांदेडकरांच्या लसीकरणासाठी रांगा 

Omicron Variant : ओमायक्राॅनची धास्ती; नांदेडकरांच्या लसीकरणासाठी रांगा 

Next

नांदेड : ओमायक्रॉंन (Omicron Variant) या कोरोनाच्या ( Corona Virus ) नव्या व्हेरीयंटची धास्ती नांदेडकरांनी घेतल्याचे चित्र आज पहायला मिळाले. आज सकाळपासूनच शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर ( Corona Vaccination ) नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. कालपर्यंत लसीकरणाकडे पाठ फिरवणाऱ्या नांदेडकरांनी आता मात्र लसीकरणाला प्राधान्य दिल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. 

प्रशासनाने हर घर दस्तक अभियान राबवून देखील नागरिक लसीकरणासाठी बाहेर आले नव्हते. मात्र ओमायक्रॉंन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटमुळे तिसरी लाट येईल याच्या भितीने नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केल्याचे आज सर्व केंद्रांवर दिसून आले. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. किरकोळ व घाऊक दुकानदार तसेच मॉल, मोंढा येथे विक्रेत्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे, स्वत:चे तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्याची खात्री करावी. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. हे लसीकरण झाले की नाही, हे तपासण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांसह तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पेट्रोल पंपावरही सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. हॉटेल्स आणि परमिट रूममध्येही येणाऱ्या ग्राहकांचे तसेच कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. सेतू सुविधा केंद्रातही ग्राहकांचे लसीकरण केल्याची खात्री करणे गरजेचे आहे. हातगाडीवाले, फळे, भाजीपाला, मांस विक्रेते, आठवडी बाजारातील विक्रेते, हमाल माथाडी कामगार, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी संस्था, सर्व शाळा-महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग आणि गॅस सिलिंडर पुरवठादार, तसेच स्वस्त धान्य विक्रेते यांनाही लसीकरण करून घेणे बंधनकारक केले आहे.

उपरोक्त सर्व जबाबदार यंत्रणांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचे स्वत:चे लसीकरण झाले की नाही, याची पडताळणी करावी. कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, असेही निर्देश दिले आहेत. सॅनिटायझर, मास्क, थर्मामीटरचा वापर करावा. या सर्व नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यास ५०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. दुकानदार आदी तसेच संस्था, आस्थापनांना त्या व्यक्तीवरील दंडाव्यतिरिक्त दहा हजार रुपये अतिरिक्त दंड आकारण्यात येईल. तसेच दोन दिवस ती संस्था बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

लसीकरणाशिवाय प्रवाशांची वाहतूक नाही
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत असणाऱ्या खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहनसेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनचालक, मालकांना लसीकरण बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या नव्या धोकादायक व्हेरियंटमुळे संकट वाढले आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण वेळेत होणे गरजेचे आहे. वाहनचालक, मालक, प्रवासी यांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहन मालक-चालकांना लसीकरण न केल्यास ५०० रुपये, तर बसच्या चालकांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑटो, टॅक्सी, बस, जीप यांनाही ही अट लागू राहणार आहे.

Web Title: Omicron Variant fear; Nandedkars Queues for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.