एकादशी निमित्त भगर खाली, विषबाधा झाल्याने ७० भाविकांवर हदगावमध्ये उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:19 PM2024-03-07T12:19:59+5:302024-03-07T12:20:21+5:30
मध्यरात्रीपासून अचानक भाविकांना चक्कर,मळमळ, अशक्तपणा असे लक्षणे सुरू झाली.
हदगाव: तालुक्यातील आठ ते दहा गावातील भाविकांना एकादशी ऊपवास असल्याने त्याने गावातील किराणा दुकानावरुन घेतलेली खुली भगर खाल्याने ६०ते७० भाविकांना विषबाधा झाली असुन हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरू आहेत.त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रदिप स्वामी यांनी सांगितले.
कामारी, हडसणी, वाळकी, वाटेगाव, हरडप, गुरफळी आदी गावातील भाविकांनी महाशिवरात्री पूर्वी येणाऱ्या एकादशीचा उपवास धरलेला होता. फराळ म्हणून गावातील किराणा दुकानावरुन घेतलेली खुली भगर भाविकांनी खाली. त्यानंतर मध्यरात्रीपासून या भाविकांना चक्कर,मळमळ, अशक्तपणा असे लक्षणे सुरू झाली. लागलीच सर्वांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळपर्यंत रुग्णांचा आकडा ७० वर गेला आहे. ठिकठिकाणावरुन रुग्ण दवाखान्यात दाखल होतच आहेत. सध्या सर्व रुग्णांची तब्बेत स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदिप स्वामी यांनी सांगितले.