नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांची २ डिसेंबर पासून एकदिवसाआड शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 06:57 PM2020-11-28T18:57:24+5:302020-11-28T18:58:13+5:30
येत्या २ डिसेंबरपासून शाळा सुरू करून गर्दी टाळण्यासाठी प्रत्यक्ष अध्यापन वर्गात एक दिवसाआड
नांदेड : जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा मूहूर्त ठरला असून २ डिसेंबरपासून शाळेची घंटा वाजणार आहे. विद्यार्थ्यांना गर्दी टाळण्यासाठी प्रत्यक्ष अध्यापन वर्गात एक दिवसाआड बोलवावे, असे आदेश जि. प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांनी काढले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून शाळा सुरू करताना करावयाचे नियोजन व शाळेतील कर्मचार्यांच्या आरटीसीपीआर चाचण्या व त्याचे अहवाल मिळविण्यासाठी लागणार वेळ याबाबी विचारात घेता जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार्या शाळा २ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने २२ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये स्पष्ष्ट केले. त्यानुसार नववी ते बारावीचे वर्ग असणार्या शाळा येत्या २ डिसेंबरपासून सुरू करून शाळात गर्दी टाळण्यासाठी प्रत्यक्ष अध्यापन वर्गात एक दिवसाआड बोलवावे, असे आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कुंडगीर यांनी २६ नोव्हेंबररोजी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना एक पत्रान्वये दिले आहेत. शाळा परिसर स्वच्च्छ आणि आरोग्यदायी ठेवावा, वर्गखेाल्या व अध्ययन व अध्यापन साहित्य निर्जंतुकीकरण करावे, मास्कचा वापर करावा, विद्यार्र्थी, शिक्षक व कर्मचार्यानी दररोज साधी आरोग्य तपासणी करावी, सुरक्षीत प्रवासाच्या दृष्ष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.