आवक वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा पुन्हा उघडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 02:01 PM2021-07-07T14:01:11+5:302021-07-07T14:05:26+5:30
Vishnupuri Dam News : आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसानेच विष्णुपूरी प्रकल्प भरल्याने यापूर्वी एकदा पाणी सोडण्यात आले होते.
नांदेड : नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचा 1 दरवाजा आज सकाळी उघडण्यात आला.आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस नसला तरी वरच्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आल्याने प्रकल्पाचा १ दरवाजा उघडण्यात आला.
नांदेड जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाने दडी मारलीये. मात्र गतवर्षी उशीरा झालेल्या पावसाने जिल्ह्यातील पाणीसाठ्यात बऱ्यापैकी पाणी होते. त्यामुळे आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसानेच विष्णुपूरी प्रकल्प भरल्याने एकदा पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान, काल सायंकाळी परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले. विष्णुपुरी प्रकल्प भरलेला असल्याने खबरदारी म्हणून प्रकल्पाचा 1 दरवाजा उघडून पाण्याचा 406 क्युसेक प्रती सेकंद वेगाने विसर्ग करण्यात येतोय.
सध्या प्रकल्पाची पाण्याची पातळी 354 मीटर इतकी असून 84% पाणीसाठा आहे. प्रकल्पाचा दरवाजा उघडण्यात आल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.