वानराने मोटरसायकलवर उडी मारल्याने एक ठार; मागे बसलेला हेल्मेेटमुळे बचावला

By श्रीनिवास भोसले | Published: May 3, 2023 02:27 PM2023-05-03T14:27:25+5:302023-05-03T14:27:57+5:30

पुलावर बसलेल्या वानराने अचानक मोटारसायकलवर उडी मारली. यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडले.

One killed after monkey jumps on motorcycle; The back seat was saved by the helmet | वानराने मोटरसायकलवर उडी मारल्याने एक ठार; मागे बसलेला हेल्मेेटमुळे बचावला

वानराने मोटरसायकलवर उडी मारल्याने एक ठार; मागे बसलेला हेल्मेेटमुळे बचावला

googlenewsNext

धर्माबाद : मोटरसायकलवरून वेगाने दोघे जात असताना पुलावर बसलेल्या वानराने अचानक मोटरसायकलवर उडी मारली. यात दोघेही खाली पडल्याने मोटरसायकलचालक जागीच ठार झाला, तर मागे बसलेला एक जण हेल्मेट असल्याने बचावला. मात्र तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील राजापूर पाटीजवळ सोमवारी (दि. १)घडली.

धर्माबाद शहरातील २६ वर्षीय अभिषेक होमबहादुर तमु (रा. केशवनगर ,किशनगड अजमेर, ह.मु. धर्माबाद) व ३० वर्षीय कृष्णा बाबुशा शेळके (रा. शांतीनगर धर्माबाद) हे दोघे जण खासगी कामानिमित्त धर्माबादहून राजापूर मार्ग नांदेडला मोटरसायकलने जात होते. राजापूर पाटीजवळील पुलावर बसलेल्या वानराने अचानक त्यांच्या मोटारसायकलवर उडी मारली. यामुळे यात दोघेही जबर खाली पडले. चालक अभिषेक होमबहादूर तमू यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला, तर मागे बसलेला कृष्णा बाबुशा शेळके यांने डोक्याला हेल्मेट लावले होते म्हणून डोक्याला मार न लागता छातीला पायाला मार लागला. तो गंभीर जखमी झाला आहे. कृष्णा शेळके याला निझामाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

आई-वडिलांचा आधार गेला
अभिषेक तमु याने धर्माबादेत गेल्या वर्षीपासून फरशीचे दुकान सुरू केले होते. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अभिषेक हा अविवाहित असून आई-वडिलांचा आधार देणारा तरुण मुलगा गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सायलु मकलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक आडे करीत आहेत.

 

Web Title: One killed after monkey jumps on motorcycle; The back seat was saved by the helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.