वृद्धाच्या खात्यातील एक लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:11+5:302021-07-21T04:14:11+5:30

आयडिया टॉवरचे साहित्या चोरीला अर्धापूर तालुक्यातील मौजे कासारखेडा येथे असलेल्या आयडिया टॉवरचे १५ हजारांचे साहित्य चोरट्याने लंपास केले. ही ...

One lakh lampas in the old man's account | वृद्धाच्या खात्यातील एक लाख लंपास

वृद्धाच्या खात्यातील एक लाख लंपास

Next

आयडिया टॉवरचे साहित्या चोरीला

अर्धापूर तालुक्यातील मौजे कासारखेडा येथे असलेल्या आयडिया टॉवरचे १५ हजारांचे साहित्य चोरट्याने लंपास केले. ही घटना १९ जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणात प्रताप बोरकर यांच्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

परिचारिकेचे दीड लाखांचे दागिने लंपास

नांदेड : प्राथमिक आरोग्य केंद्रातील ड्युटी संपल्यानंतर दुचाकीवरून घराकडे जात असलेल्या परिचारिकेच्या हातातील १ लाख ४२ हजार रुपयांचे दागिने असलेली पर्स हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. ही घटना १९ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

मेघा प्रमोद निर्मल या सोनखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून आहेत. १९ जुलै रोजी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर त्या दुचाकीवरून परत येत होत्या. त्यांची दुचाकी डेरला पाटीजवळ नर्सरीच्या पुढे आली असताना, मागाहून दुचाकीवर दोन अनोळखी तरुण आले. त्यातील एका तरुणाने निर्मल यांच्या दुचाकीला अडकविलेली पर्स हिसकावून पळ काढला. निर्मल यांनी आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या पर्समध्ये १ लाख ४२ हजारांचा ऐवज होता. या प्रकरणात सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चौकट- साडेसहा लाखांचे स्पेअर पार्ट चोरीला

शहरातील लातूर फाटा भागात ट्रकमधील ट्रॅक्टरचे साडे सहा लाख रुपये किमतीचे स्पेअर पार्ट लंपास करण्यात आले. ही घटना १५ जुलै रोजी घडली. अनिल तुकाराम गायकवाड रा.कोल्हापूर हे रात्रीची वेळ असल्याने लातूर फाटा रस्त्यावर ट्रक उभा करून क्लीनरसह झोपले होते. त्याच वेळी चोरट्याने ६ लाख ४५ हजारांचे साहित्य लांबविले. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: One lakh lampas in the old man's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.