बिलोलीतील विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 04:10 PM2020-01-23T16:10:59+5:302020-01-23T16:12:49+5:30

याप्रकरणी मुख्याध्यापकांसह पाच जणांवर गुन्हे दाखल असून उर्वरित चार आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही.

One of the main accused in Biloli student rape case arrested | बिलोलीतील विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

बिलोलीतील विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

Next
ठळक मुद्दे मुख्याध्यापकासह चार जण फरार सपोनि. शिंदेंची चौकशी करण्याची मागणी 

बिलोली (जि़ नांदेड) : तालुक्यातील शंकरनगर येथील श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी सय्यद रसूल याला पाचव्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकांसह पाच जणांवर गुन्हे दाखल असून उर्वरित चार आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही.

सय्यद रसूल, दयानंद राजुळे यांच्यासह इतर तिघांवर माहिती दडवून ठेवल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला होता़ परंतु घटना उघडकीस आल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते़ आरोपींच्या अटकेसाठी सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहेत़ अनेक तालुक्यांमध्ये बंदही पाळण्यात आला होता़ दरम्यान, बुधवारी पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ, बालाजी हिंगनकर, केंद्रे, बाबर, श्रीरामे यांच्या पथकाने बोंढार शिवारात लपून बसलेल्या सय्यद रसूल महेबूब याला अटक केली़ दुसराही आरोपी लवकरच पकडला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक  सोमनाथ शिंदे यांना तात्काळ निलंबित करुन स्वयंपाकी महिलेचे नाव वगळण्यात यावे अन्यथा २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा केशव खासबागे व राजरत्न डुमणे यांनी दिला आहे़   

सपोनि. शिंदेंच्या भूमिकेवर संशय
पीडित मुलीच्या आईने रामतीर्थ पोलिसांत तक्रार दिली होती़ या प्रकरणात सपोनि. सोमनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर सामाजिक संघटनांकडून संशय व्यक्त करण्यात आला होता़ त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे़ 

बिलोली, उमरीत कडकडीत बंद 
शाळेत अल्पवयीन   विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी बिलोली, उमरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.बिलोलीत सर्व बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चास शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली नागरिकांनी रास्ता रोको करून प्रशासनाला निवेदन सादर केले.

पाचव्या दिवशीही शाळा भरली नाही
साईबाबा माध्यमिक विद्यालयात सदरील घटना उघडकीस आल्यानंतर पाच दिवस उलटले आहेत; परंतु गेल्या पाच दिवसांपासून शाळेत एकही विद्यार्थी आला नाही़ तसेच इतर शिक्षकही शाळेत येण्यास धजावत नाहीत़ त्यामुळे पाच दिवसांपासून शाळा बंदच आहे़  

Web Title: One of the main accused in Biloli student rape case arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.