एक झाड माझे अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:16 AM2019-06-06T01:16:27+5:302019-06-06T01:18:05+5:30
वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असून त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत़ अशाचप्रकारे नांदेडच्या काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत १ हजार वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचा संकल्प केला आहे़ या अभियानाचा प्रारंभ पर्यावरणदिनी नांदेड येथील केमिस्ट भवन परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला़
नांदेड : वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असून त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत़ अशाचप्रकारे नांदेडच्या काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत १ हजार वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचा संकल्प केला आहे़ या अभियानाचा प्रारंभ पर्यावरणदिनी नांदेड येथील केमिस्ट भवन परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला़
पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एकत्र येत ३० मे रोजी पहिली बैठक घेवून एक हजार वृक्षलागवड करून संगोपन, संवर्धन करण्याचा निर्धार केला़ यावेळी आनंदवन मित्र परिवार, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, साईप्रसाद यासह विविध सेवाभावी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती़ दरम्यान, सदर अभियानास एक झाड माझे अभियान मित्र परिवार असे नाव देण्यात आले असून त्याअंतर्गत सेवाभावी वृत्तीने काम सुरू करण्यात आले आहे़
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवारी या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली़ यावेळी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़उद्धव भोसले, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, आयुक्त लहुराज माळी, मुख्य वनसंरक्षक अधिकारी श्रीकांत ठाकरे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती़ या अभियानात आजपर्यंत दोनशेहून अधिक जणांनी सहभाग नोंदविला आहे़
केमिस्ट भवन येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनासाठी सखोल मार्गदर्शन करून उपक्रमाचे कौतुक केले़ यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी शिवकन्या बहेनजी, दीपक कोठारी, अशोक गंजेवार, लक्ष्मण क्षीरसागर, संजय बजाज, विठ्ठल पावडे, अमित काबरा, शमेंद्र हुंडीवाला, डॉ़अतुल काबरा, डॉ़ दळवी, प्रा़ढगे आदींची उपस्थिती होती़ या उपक्रमाचा खर्च पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत़
भारतीय मातीतील वृक्षांची होणार लागवड
वृक्षारोपण करताना भारतीय मातीतील आणि आपल्या संस्कृतीतील झाडांची निवड केली जाणार आहे़ जेणेकरून भविष्यात त्यावर पक्ष्यांचा चिवचिवाट पहायला मिळाला पाहिजे़ यामध्ये चिंच, लिंब, जांभूळ, पिंपळ, वड, आवळा आदी प्रकारची झाडेला वण्यात येणार आहेत़
सहा ते दहा फूट उंच असणाऱ्या वृक्षांची लागवड केली जाणार असून त्याचे वर्षभर संगोपन केले जाणार आहे़ आॅक्टोबरपर्यंत झाडे पावसाच्या पाण्यावर जगतात़ तेथून पुढे नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत वृक्षाला पाणी घालणे, फवारणी करणे, खत घालण्यापर्यंतचे नियोजन आहे़