एका वर्षात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:18 AM2021-05-20T04:18:52+5:302021-05-20T04:18:52+5:30
कोरोना महामारीचा शिरकाव होऊ लागल्याने २०२० मध्ये मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली तर ...
कोरोना महामारीचा शिरकाव होऊ लागल्याने २०२० मध्ये मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली तर अनेक कारखाने बंद पडले. त्यातच भारतात उत्पादित होणाऱ्या प्रत्येक उत्पादनात घट होऊ लागल्याने संबंधित वस्तू, धान्य, किराणा सामानाच्या किमतीत वाढ झाली. दरम्यान, लॉकडाऊन कालावधीत किराणा मालाची म्हणजेच साखर, शेंगदाणे, डाळी, तेल, बेसन आदी साहित्याची मागणी भरमसाठ वाढली. परिणामी मागणी तेवढा पुरवठा होत नसल्याने या किराणा साहित्याची साठेबाजी करून व्यापाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा भावाने किराणा सामान विक्री केले. मागील वर्षभरापूर्वी असलेल्या किमतीपेक्षा प्रत्येक वस्तूची किमती ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. तर खाद्यतेलाच्या किमतीत ही जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. किराणा साहित्य दरवाढ मागे हमाली, पेट्रोल, डिझेल दरवाढ, विविध करात वाढ आदी ही कारणीभूत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने लावलेल्या विविध करामुळे कच्चा तेलाच्या किमतीत घट होऊन ही राज्यातील पेट्रोल, डिझेलच्या किमतीत घट झालेली नाही. उलट मागील वर्षभरात डिझेलच्या किमतीत ३० ते ३५ टक्क्यांची वाढ झाली असून पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाला या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसत आहे.
१) किराणा दर (प्रति किलो)
मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
तूर डाळ - १४० - ११० - १३०
हरभरा डाळ ९० - ७० - ९०
तांदूळ ४० - ५० - ६०
साखर ३२ - ३५ - ४०
गुळ - ४० - ४० - ४५
शेंगदाणे -
तेलही दुप्पट महाग (दर प्रति लिटर)
मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
शेंगदाणा तेल - ८०, १००, १५५
सूर्यफुल तेल- ९०, ११०, १५०
करडी तेल- १७०, २००, २६०,
सोयाबीन तेल-७८, ९०, १३०
पामतेल- ७०, १००, १२०
१) डिझेल दराचा ग्राफ (भाव प्रति लिटर)
जानेवारी २०२० जून २०२० जानेवारी २०२१ मे २०२१
६७.५०, ७२.०२, ८१.४४, ९१.५७