बुद्ध जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यानमाला २२ मेपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:03+5:302021-05-21T04:19:03+5:30
या व्याख्यानमालेचा प्रारंभ शनिवार दि. २२ मे रोजी होणार असून ती २६ मेपर्यंत चालणार असल्याचे संयोजक प्रशांत वंजारे व ...
या व्याख्यानमालेचा प्रारंभ शनिवार दि. २२ मे रोजी होणार असून ती २६ मेपर्यंत चालणार असल्याचे संयोजक प्रशांत वंजारे व समन्वयक गंगाधर ढवळे यांनी सांगितले. २२ मे रोजी पहिले पुष्प झेन मास्टर सुदस्सन, पुणे हे 'आधुनिक विज्ञान आणि बुध्द धम्म' या विषयावर, २३ मे रोजी नागपूर येथील प्रसिद्ध विचारवंत प्रकाश खरात हे ‘आधुनिक बुद्ध धम्म आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर बोलतील. सोमवारी ‘बुद्धाचा स्त्रीवाद’ या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख वंदना महाजन बोलणार आहेत, तर २५ मे रोजी नांदेड येथील भदंत पंय्याबोधी थेरो यांची ‘बुद्धाचा दु:खनिरोध’ या विषयावर धम्मदेसना पार पडेल. अध्यक्षीय समारोप डॉ. यशवंत मनोहर हे 'तत्त्वज्ञानी बुद्ध' हा विषय घेऊन करणार आहेत.