जिल्हा हिवताप व हत्तीरोग कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ऑनलाईन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:22 AM2021-09-14T04:22:26+5:302021-09-14T04:22:26+5:30
संस्थेचे चेअरमन सुभाष कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत दीर्घमुदती कर्जमर्यादा ७ लाखांवरून १० लाख रूपये करणे, रिझर्व्ह फंडामधील ...
संस्थेचे चेअरमन सुभाष कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत दीर्घमुदती कर्जमर्यादा ७ लाखांवरून १० लाख रूपये करणे, रिझर्व्ह फंडामधील रक्कम वळती करून पतसंस्थेस फ्लॅट, इमारत घेणे, विमा लागू करणे या चर्चा करून करण्यात आली. सन २०२०-२१ या वर्षात नफ्यामध्ये वाढ झाल्याने ७ व १० टक्केप्रमाणे लाभांश कर्मचारी यांच्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नवीन मोंढा येथील खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे.
सभासदांना विमा लवकरात लवकर लागू करण्यात यावा अशी मागणी केली. येत्या काही दिवसांत सर्व सभासदांचा विमा करण्यात येणार आहे. सभासदांची माहिती संबंधित कार्यालयाकडून अप्राप्त आहे, अशी माहिती कल्याणकर यांनी दिली.
या वेळी सचिव सत्यजित टिप्रेसवार, अशोक ढवळे, चंद्रभान धोंडगे, संजय भोसले, बालाजी आळणे, कैलास मोरे, गजानन कदम, श्रीमती वानखेडे उपस्थित होते. मोहन पेंढारे, माणिक गिते, देविदास भुरेवार, प्रदीप गोधणे, मनोहर खानसोळे, राजकुमार ढवळे हे ऑनलाईन होते. पतसंस्थेच्या वतीने सत्यजीत टिप्रेसवार यांनी आभार मानले.