महामार्ग पाेलिसांचा ऑनलाईन याेगाभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:34+5:302021-06-22T04:13:34+5:30
नांदेड : जागतिक याेग दिनाच्या निमित्ताने साेमवारी राज्यातील महामार्ग पाेलीस पथकांनी ऑनलाईन याेगाभ्यास केला. महामार्गावरील पाेलीस मदत केंद्रांसमाेर कर्मचारी ...
नांदेड : जागतिक याेग दिनाच्या निमित्ताने साेमवारी राज्यातील महामार्ग पाेलीस पथकांनी ऑनलाईन याेगाभ्यास केला. महामार्गावरील पाेलीस मदत केंद्रांसमाेर कर्मचारी याेग साधना करतानाचे चित्र पाहायला मिळाले. महामार्ग सुरक्षा विभागाचे अप्पर पाेलीस महासंचालक डाॅ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पाेलिसांच्या दिनचर्येला शिस्त लागावी, यासाठी ऑनलाईन का हाेईना याेगासनांचा आग्रह धरला. त्यानुसार नागपूर, औरंगाबाद, पुणे, ठाणे या चारही परिक्षेत्रांमध्ये समाविष्ट महामार्ग पाेलीस पथकातील सुमारे दीड हजारांवर पाेलीस कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन याेगामध्ये सहभाग घेतला. काेणी घरून, तर बहुतेकांनी महामार्ग पाेलीस पथक कार्यालयासमाेरच चटई टाकून याेगा करण्याला पसंती दिली. अप्पर महासंचालक डाॅ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर-नांदेड परिक्षेत्राच्या पाेलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्यासह अनेक पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याेगासने केली.
चाैकट........
दिनचर्येला शिस्त लावण्याचा प्रयत्न
सततचा बंदाेबस्त, अवेळी जेवण, रात्र गस्त यामुळे पाेलिसांच्या आराेग्यावर विपरित परिणाम हाेताे. त्यातून त्याची सुटका व्हावी, आराेग्य उत्तम राहावे यासाठी डाॅ. उपाध्याय यांनी महामार्ग पाेलीस कर्मचाऱ्यांना नियमित याेगासने करण्याचाही सल्ला दिला.