ऑनलाईन प्रक्रियेमुळे दिव्यांगांचे प्रमाणपत्र झाले सुलभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:22 AM2021-02-25T04:22:22+5:302021-02-25T04:22:22+5:30
प्रतिक्रिया जिल्ह्यातील अपंगांना प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही ...
प्रतिक्रिया
जिल्ह्यातील अपंगांना प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही प्रमाणात केंद्रातील काम विस्कळीत झाले असले, तरी दिव्यांगांना प्रमाणपत्र वेळेत देऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी सातत्याने सूचना दिल्या जातात.
- डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड
वर्षभरापासून मारतोय फेऱ्या
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज केला; पण त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. हेच कारण देत भोकर उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची तपासणी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रही उपलब्ध होत नाही. वर्षभरापासून मी भोकर उपजिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्रासाठी फेऱ्या मारत आहे. - विश्वनाथ मुसळे, थेरबन, ता. भोकर
नांदेडला जाण्याच्या सूचना
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी कारणे सांगून दिव्यांगांना माघारी पाठविले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात अजूनही प्रमाणपत्र दिली जात नाहीत. वर्षभरापासून प्रमाणपत्र मिळाले नाही.
राजू धोरणाळे, चोंडी, ता. मुखेड