विष्णूपुरीत केवळ ३१ दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:26 AM2018-12-21T00:26:35+5:302018-12-21T00:28:44+5:30

संपूर्ण शहराची तहाण भागवणा-या विष्णूपुरी प्रकल्पात अवघे ३१ दलघमी पाणी उरले असून हे पाणी संपल्यानंतर काय? असा प्रश्न उभा राहिला आहे.

Only 31 Dalgamy water in Vishnupurya | विष्णूपुरीत केवळ ३१ दलघमी पाणी

विष्णूपुरीत केवळ ३१ दलघमी पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देइसापूरचे पाणी नांदेडलाआजपासून उत्तर नांदेडचा पाणीपुरवठा सांगवी बंधाऱ्यातून

नांदेड : संपूर्ण शहराची तहाण भागवणा-या विष्णूपुरी प्रकल्पात अवघे ३१ दलघमी पाणी उरले असून हे पाणी संपल्यानंतर काय? असा प्रश्न उभा राहिला आहे. त्याचवेळी इसापूर प्रकल्पातून महापालिकेने पहिल्या टप्प्यात २ दलघमी पाणी घेतले असून यातील १ दलघमी पाणी सांगवी बंधा-यात पोहचले आहे.
संपूर्ण शहराची तहान भागवण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्पात महापालिकेने ३२ दलघमी पाणी राखीव केले आहे तर इसापूर प्रकल्पातही १५ दलघमी पाण्याचे आरक्षण केले आहे. विष्णूपुरी प्रकल्पातून सुरू असलेल्या अवैध पाणी उपसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा कमी होत आहे. या अवैध पाणी उपसावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या ७ संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांची कामगिरीही अशी-तशीच असल्याने अवैध पाणी उपसा सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच १६ डिसेंबर पासून विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातील एक्सप्रेस फिडर बंद केल्याने अवैध पाणी उपसावर काही प्रमाणात आळा बसला आहे.
चिंतेची बाब म्हणजे डिसेंबरच्या अखेरीस विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ३१.२४ दलघमी साठा उरला आहे. ३८.६६ टक्के पाणी प्रकल्पात उपलब्ध आहे. आणखी जून-जुलै पर्यंत शहराला उपलब्ध पाण्यातून पाणी पुरवठा कसा होईल? हा प्रश्न आहे. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रात जवळपास १ हजाराहून अधिक विद्युत पंपाद्वारे अनधिकृतपणे पाणी उपसा सुरू असल्याची बाब सिंचन विभागाकडून स्पष्ट करण्यात आली होती. प्रकल्पातून जवळपास ०.७५ दलघमी जलसाठा प्रतिदिन कमी होत होता. हा पाणी उपसा रोखण्यासाठी ७ पथके स्थापन करण्यात आली. मात्र या पथकांची कामगिरी पाहता अनधिकृत पाणी उपशावर आळा बसविण्यात प्रारंभी यश आलेच नव्हते. पथकातील अनेक विभागाचे कर्मचारी गस्तीवर आलेच नाहीत. त्यातही महत्वाचे विभाग असलेल्या महावितरण आणि पोलिस विभागातील कर्मचाºयांचा समावेश होता. यामुळे प्रकल्पातील अवैध पाणी उपसा कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. १६ डिसेंबर पासून एक्सप्रेस फिडर बंद करण्यात आले आहेत.
विष्णूपुरीतील साठा झपाट्याने घटत असतानाच इसापूर प्रकल्पाचे २ दलघमी पाणी महापालिकेने मागितले आहे. हे पाणी गुरुवारी आसना नदीद्वारे सांगवी बंधा-यात पोहोचले आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपासून दोन विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. आसनेवरील पाण्याद्वारे उत्तर नांदेडची तहान आगामी काळात भागवली जाणार आहे. २ दलघमी पैकी १ दलघमी पाणी उपलब्ध झाले असून जवळपास २० ते २५ दिवस उत्तर नांदेडला हे पाणी पुरणार आहे.
सांगवी बंधाºयातील पाणी काबरानगर येथून जलशुद्धीकरण केंद्रात घेतले जाते. या केंद्रातून वर्कशॉप, नंदीग्राम, लेबर कॉलनी, नाना-नानी पार्क, हैदरबाग आदी भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पावरील काही भाग हलका होणार आहे. येथे सुरू असलेल्या चार पैकी दोन पंप बंद राहतील. दोन पंपाद्वारे दक्षिण नांदेडसह शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पात उरलेले ३१ दलघमी पाण्याचे योग्य संरक्षण न केल्यास आगामी काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य नांदेडकरांपुढे उभे राहणार आहे. त्याचवेळी पाणी आणण्यासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने पाण्याची चिंता आणखीनच वाढल्याचे दिसून येते.
हातपंप, बोअरवेल दुरुस्तीला सुरुवात
आगामी काळातील पाण्याचे संकट पाहता महापालिका प्रशासन आतापासूनच तयारीला लागले आहे. शहरातील हातपंप व बोअरवेल दुरुस्तीला प्रारंभ करण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले. शहरात एकूण ७१० हातपंप आहेत तर २५९ विद्युत पंप आहेत. यातील नादुरुस्त पंप दुरुस्त केले जाणार आहेत. शहरात असलेल्या अनधिकृत नळ कनेक्शनवरही महापालिकेने लक्ष घातले आहे. अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. राजेश चव्हाण यांच्यासह अन्य कर्मचाºयांचा या पथकात समावेश आहे.

Web Title: Only 31 Dalgamy water in Vishnupurya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.