जिल्ह्यात केवळ ७२ रुग्णालयांचीच नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:42+5:302021-01-08T04:54:42+5:30
नांदेड : बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार खाजगी रुग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात ग्रामीण भागात सद्य:स्थितीत केवळ ७२ ...
नांदेड : बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार खाजगी रुग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात ग्रामीण भागात सद्य:स्थितीत केवळ ७२ खाजगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे केवळ सात तालुक्यांच्या ठिकाणीच ही नोंदणीकृत रुग्णालये आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले असले, तरी खाजगी रुग्णालयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या रुग्णालयांनी अधिकृत नोंदणी अद्याप केली नाही. गेल्या काही वर्षांत रुग्णालयांच्या नाेंदणीने शतकही गाठले नाही. त्यामुळे विनापरवाना रुग्णालये स्थापन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यांत तर एकाही खाजगी रुग्णालयाने नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षात किती नोंदणी झाली?
जिल्ह्यातील ग्रामीण भागात खाजगी रुग्णालये स्थापन करताना नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून नोंदणी करणाऱ्या रुग्णालयांची संख्या वाढलीच नाही. दरवर्षी काही मोजकेच प्रस्ताव नोंदणी करण्यासाठी येतात.
नोंदणी न केल्यास होणारी कारवाई...
जिल्ह्यात बोगस डाॅक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा डाॅक्टरांकडून ग्रामीण भागात सर्रास रुग्णालये स्थापन करून रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसाची लूट करतात. २०१५ मध्ये अशा डाॅक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.
खाजगी रुग्णालयांकडून नोंदणीकडे दुर्लक्ष
तालुकानिहाय आकडेवारी
हदगाव ३०
देगलूर १८
माहूर२
किनवट२
मुखेड७
नांदेड ३
नायगाव ९
जिल्ह्यात प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार नोंदणी केलेल्या खाजगी रुग्णालयांची संख्या ७२ असून बाॅम्बे ॲक्टनुसार नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र, संबंधितांना याचा विसर पडतो. त्यामुळे ग्रामीण भागात नोंदणी करणाऱ्या रुग्णालयांची संख्या अल्प आहे. बोगस डाॅक्टरांवर नक्कीच कारवाई करण्यात येइल.
- डाॅ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड