शासकीय रुग्णालयात नातेवाईकच ओढतात स्ट्रेचर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:28+5:302021-01-25T04:18:28+5:30
चौकट- हिंगोली जिल्ह्यातून आम्ही पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी या ठिकाणी आलो आहेत. डॉक्टरांनी तपासणी करण्यासाठी दुसऱ्या कक्षात जाण्यास सांगितले. परंतु स्ट्रेचर ...
चौकट- हिंगोली जिल्ह्यातून आम्ही पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी या ठिकाणी आलो आहेत. डॉक्टरांनी तपासणी करण्यासाठी दुसऱ्या कक्षात जाण्यास सांगितले. परंतु स्ट्रेचर ओढायला इथे कुणी कर्मचारीच नाही. त्यामुळे आम्हीच स्टेचर ओढतोय.- बालाजी जाधव.
चौकट- एका कक्षात दोन ते तीनच चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. त्यामुळे स्ट्रेचर ओढण्यासाठी कुणी भेटत नाही. आम्हाला नेमका कक्ष कुठे आहे. याचीही माहिती नाही. त्यामुळे चौकशी करीत आम्ही कसेबसे स्ट्रेचर ओढत त्या कक्षापर्यंत पोहोचतो. -विश्वास ठाकूर
चौकट- रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. परंतु आहे त्या कर्मचाऱ्यांवरच रुग्णांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. एखादेवेळी कर्मचारी दुसऱ्या रुग्णाला घेऊन गेल्यास स्ट्रेचरवर असलेल्या रुग्णाला प्रतीक्षा करावी लागू शकते. परंतु असे प्रकार क्वचितच होतात. चतुर्थ श्रेणी कर्मचारी मिळाल्यास ही समस्या दूर होईल.
- डॉ. वाय. एच. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक