नांदेड जिल्ह्यात दोन वर्षात केवळ साडेसातशे घरकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:19 AM2018-01-19T00:19:42+5:302018-01-19T00:20:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : तुटपुंजा निधी, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आॅनलाईन प्रक्रिया यामुळे जिल्ह्यातील घरकुल योजनेला खिळ बसली असून १५ हजार ५७१ घरकुलांना मंजुरी मिळूनही दोन वर्षात केवळ ७४८ घरकुल बांधून पूर्ण झाले आहेत़ त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना नावालाच उरली आहे़
जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून घरकुलांचे बांधकाम कासवगतीने सुरू आहेत़ केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेकडे पाहिले जाते़ या योजनेला २० नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रारंभ झाला़ ही योजना म्हणजे सर्वांसाठी घरे या योजनेचाच एक भाग आहे़ गोरगरीबांना आपल्या हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी शासनाकडून १ लाख २० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते़ या घरकुलात एक स्वयंपाक घर तसेच शौचालयाचा समावेश आहे़ २०११ च्या डाटामधून ग्रामसभेद्वारे या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते़ त्यानंतर चार टप्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत केला जातो़ लाभार्थ्यांना पहिला हप्ता ३० हजार तसेच दुसरा,तिसरा व चौथ्या टप्यातही ३० हजार रूपये असे एकुण १ लाख २० हजार रूपये दिले जातात़ जिल्ह्यासाठी १७ हजार ९३२ घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यापैकी १५ हजार ५७१ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे़ दोन वर्षात केवळ ७४८ घरकुले पूर्ण झाले आहेत़
लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होत असली तरी त्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ आॅनलाईन प्रक्रियेत अनेकांची अर्ज त्रुटीत निघाले असून अपुºया कागदपत्रामुळे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे़ वाढत्या महागाईच्या काळात केवळ १ लाख २० हजार रूपयात घर बांधणे अशक्य झाले आहे़ विट, सिमेंट, वाळू यांचे भाव वाढले आहेत़ त्यात पहिला हप्ता ३० हजार रूपयाचा मिळत असल्याने पायाभरणीसाठी हा निधी अपुरा पडत आहे़ त्यामुळे घरकुलाचे बांधकाम दुसºया टप्यातच रेंगाळत आहे़ दुसºया हप्ताही ३० हजार रूपयांचा असल्याने बांधकामाला गती मिळत नाही़ त्यामुळे लाभार्थ्यांसाठी ही योजना डोकेदुखी ठरत आहे़ अनेकांना घर बांधण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागत आहे़
४ घरकुल मंजुरी -अर्धापूर - २३०, भोकर-७६८, बिलोली- २०७४, देगलूर -१४०१, धर्माबाद -५८१, हदगाव -४२९, हिमायतनगर -६२५, कंधार -११०१, किनवट- १३२३, लोहा-८२४,माहूर - ७६८, मुदखेड- ४९४, मुखेड- २३००, नायगाव- १८४१, नांदेड -३६०, उमरी - ४५२़
४बांधकाम पूर्ण झाले- अर्धापूर -३३, भोकर - ७, बिलोली- ७५, देगलूर -५२, धर्माबाद -६५, हदगाव -८, हिमायतनगर -९७, कंधार -२१, किनवट- ५१, लोहा-७, माहूर -६२, मुदखेड-२५, मुखेड-७३, नायगाव -३९, नांदेड-१२७, उमरी- ६़