खाजगी रुग्णालयांनी बंद ठेवल्या ओपीडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:34 AM2020-12-12T04:34:25+5:302020-12-12T04:34:25+5:30

सीसीआयएम यांनी भविष्यात बारावी विज्ञानची परीक्षा बंद करून सर्वांना एमबीबीएस पदवी देण्यात यावी. जेणेकरून आयुर्वेद, युनानी बोगस यादी, जेणेकरून ...

OPD closed by private hospitals ... | खाजगी रुग्णालयांनी बंद ठेवल्या ओपीडी...

खाजगी रुग्णालयांनी बंद ठेवल्या ओपीडी...

Next

सीसीआयएम यांनी भविष्यात बारावी विज्ञानची परीक्षा बंद करून सर्वांना एमबीबीएस पदवी देण्यात यावी. जेणेकरून आयुर्वेद, युनानी बोगस यादी, जेणेकरून वर्गवारी करण्याची आवश्यकता पडणार नाही. आयुर्वेदिक डॉक्टरांना त्यांच्या नावापुढे वैद्य लिहिणे बंधनकारक करावे, सीसीआयएमने मॉडर्न मेडिसीनमधील ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याविषयी आयुर्वेदिक पदवीधरांना केलेली सूचना मागे घ्यावी. सर्वसामान्य जनता व रुग्ण यांना मॉडर्न मेडिसीनमधील एम.डी., एम.एस. व आयुर्वेदातून झालेले एम.डी., एम.एस. हा फरक कळण्यासाठी आयुर्वेदिक शल्यचिकित्सक लिहिण्यास भाग पाडावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी पहिल्या टप्प्यात आयएमएने शुक्रवारी सकाळी ६ ते सायंकाळी १० वाजेदरम्यान सर्व बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवले होते. आपत्कालीन सेवा मात्र सुरू होती. यावेळी अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, सचिव डॉ. आवेश अब्बासी, डॉ. पालीवाल यांच्यासह मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची उपस्थिती होती.

Web Title: OPD closed by private hospitals ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.