खुल्या आकाशी मद्यपींचा मेळा; नांदेडात मोकळ्या जागा, बंद इमारतींना आले दारु खड्ड्याचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:56 AM2017-11-25T00:56:52+5:302017-11-25T00:56:56+5:30
नांदेड शहरातील मोकळ्या जागा तसेच बंद इमारती, घरे ही मद्यपींसह जुगाºयांचा अड्डा बनला आहे़ विशेषत: शासकीय रूग्णालयासह बंद इमारत परिसरात दिवसाढवळ्या मद्यपींचा मेळा भरत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील मोकळ्या जागा तसेच बंद इमारती, घरे ही मद्यपींसह जुगाºयांचा अड्डा बनला आहे़ विशेषत: शासकीय रूग्णालयासह बंद इमारत परिसरात दिवसाढवळ्या मद्यपींचा मेळा भरत आहे़
शहरातील वाईन शॉप, देशी दारूची दुकाने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बंद होत आहेत़, परंतु खुल्या आकाशी मद्यपी बसण्याची ठिकाणे दिवसेंदिवस वाढत आहेत़ यामध्ये शहरातील मोकळे भूखंड आणि शासकीय इमारती परिसरात मद्यपींचे टोळके बसलेले पहायला मिळत आहेत़ शहरातील वर्दळीच्या ठिकाणीदेखील बिनदिक्कतपणे हे मद्यपी बसत आहेत़ सोबत दारू, पाणी आणि चिवडा, फुटाणे असे साहित्य घेवून बसणाºया दारूड्यांनी शासकीय रूग्णालयाच्या गार्डनला गार्डन बारचे बनवले आहे़ बाजूला महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक असे अनेक शासकीय कार्यालये व न्यायालय परिसर आहे़ त्याचबरोबर वजिराबाद पोलीस ठाणेदेखील थोड्याच अंतरावर आहे़, परंतु या मद्यपींवर पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही़
नांदेड शहराच्या सांस्कृतिक चळवळीचा इतिहास सांगणाºया कलामंदिरालादेखील मद्यपींनी लक्ष्य केले आहे़ या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते, परंतु परिसरातील वर्दळ, वाहतूक पोलीस, आजूबाजूचे दुकानदार यांना न जुमानता मद्यपी सकाळ, दुपार, सायंकाळी त्यांना वाटेल त्यावेळी कलामंदिर परिसरातील ओटा, पायºया आणि पाठीमागच्या मोकळ्या मैदानावर आपले बस्तान मांडत आहेत़ सध्या या परिसरात स्वेटरची दुकाने आणि बाजूला महासेल आहे़ या ठिकाणी येणाºया महिला-मुलींची मद्यपी शिट्ट्या मारून, खाणा-खुणा करून छेड काढतात़
जुना मोंढा परिसरातील टॉवरची हीच स्थिती आहे़ येथील गार्डनमध्ये पत्याचे डाव सुरू असतात़ ओट्यांवर मद्यपींचा मेळा भरतो़शहरातील महात्मा फुले मंगल कार्यालय परिसर, नाना-नानी पार्क समोरील रस्ता, कॅनॉल रस्ता, विमानतळ रस्ता, आनंदनगर चौक, पावडेवाडी नाका परिसरातील मोकळी जागा, वर्कशॉप कॉर्नरचा पाण्याच्या टाकीचा परिसर आदी जागा मद्यपींचे अड्डे बनलेत.