महानगरपालिकेच्या करवाढीला विरोध नांदेडकरांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:18 AM2018-07-13T01:18:33+5:302018-07-13T01:18:52+5:30

दोन वर्षांपासून वॉर्डविकास निधीची रखडलेली कामे, अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्न, वेळीअवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांचा डोंगर शहरवासियांपुढे उभा असताना आता ४० टक्के करवाढीचा बोजा मालमत्ताधारकांवर टाकण्याची तयारी मनपा प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आली आहे.

Opponents of Municipal Corporation protest against Nandedkar | महानगरपालिकेच्या करवाढीला विरोध नांदेडकरांचा विरोध

महानगरपालिकेच्या करवाढीला विरोध नांदेडकरांचा विरोध

Next
ठळक मुद्देशहरवासियांपुढे समस्यांचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दोन वर्षांपासून वॉर्डविकास निधीची रखडलेली कामे, अनेक भागांत मूलभूत सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा प्रश्न, वेळीअवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांचा डोंगर शहरवासियांपुढे उभा असताना आता ४० टक्के करवाढीचा बोजा मालमत्ताधारकांवर टाकण्याची तयारी मनपा प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आली आहे. करवाढीची कोणतीही घोषणा होण्यापूर्वीच अपेक्षित करवाढीला नागरिकांसह विविध राजकीय मंडळींकडून विरोध होत आहे.
शहरात सध्या जीआयएस कंपनीकडून मालमत्तांचे मूल्यांकन केले जात आहे. शहरात प्रतिदिन १ ते दीड हजार मालमत्ताचे मूल्यांकन केले जात आहे. या मूल्यांकनानंतर मालमत्तधारकांना कराच्या नोटीस बजावल्या जाणार आहेत. प्रस्तावित करवाढ किती राहील? हे अद्यापही अस्पष्टच असले तरीही करवाढ होणार हे निश्चित आहे. रेडी रेकनर दरानुसार करवाढ झाल्यास ती विद्यमान कराच्या दुप्पट होईल. मात्र चालू कराच्या ४० टक्क्याहून अधिक करवाढ करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून जवळपास ४० टक्के करवाढ केली जाईल, असे संकेत दिले जात आहेत. प्रशासनाकडून मालमत्ताकराच्या नोटीसही तयारीही केली जात आहे. त्यात नवीन दरानुसार वाढीव अथवा कमी झालेला कर यापुढेही कर नोटीसीमध्येही वसूल केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता हातात पडलेल्या कराच्या मागणी नोटीसमध्ये कमी-अधिक आकारणी झाल्यास ती पुढच्या कर आकारणीत वसूल केली जाणार आहे.
महापालिकेच्या प्रस्तावित करवाढीस शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे आ. हेमंत पाटील यांनीही विरोध दर्शविला आहे. शिवसेनेचे एकमेव नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनीही करवाढ झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता महापालिकेने सुचविलेल्या करवाढीला सत्ताधारी कितपत स्वीकारतील, हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
---
काँग्रेसकडूनही करवाढीच्या नोटीसला विरोधच !
सत्ताधारी काँग्रेसनेही प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या करवाढीच्या नोटीसला विरोध दर्शविला आहे. शहरातील मालमत्तांचे जीआयएसकडून फेरमूल्यांकन केले जात आहे. या फेरमूल्यांकनानंतर जी काही नैसर्गिक करवाढ होईल ती मान्य करण्यात येईल. मात्र प्रशासनाकडून फेरमूल्यांकनापूर्वीच दिल्या जाणाºया नोटीस या चुकीच्या असल्याचे सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी स्पष्ट केले. याबाबत महापौर शीलाताई भवरे, सभागृहनेते गाडीवाले यांनी आयुक्तांशी चर्चाही करत प्रस्तावित करवाढीस विरोध दर्शविला आहे. यापूर्वी शहरवासियावर रेडी रेकनर दरानुसार करवाढीचा मोठा बोजा बसला आहे. शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकनानुसार कर आकारणी करावी. मात्र त्यात कोणतीही वाढ करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Opponents of Municipal Corporation protest against Nandedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.