कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:09 AM2018-12-10T00:09:45+5:302018-12-10T00:10:20+5:30
एकविसावं शतक आलं तरी कुणब्याची तीच गती... कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती... हाडं उगाळले त्यानं कोण पुसणार? पाय खोरू खोरू तो ढेकळात मेला, हरित क्रांती कवा होईल ग्यानबाराव...
नांदेड : एकविसावं शतक आलं तरी कुणब्याची तीच गती... कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती... हाडं उगाळले त्यानं कोण पुसणार? पाय खोरू खोरू तो ढेकळात मेला, हरित क्रांती कवा होईल ग्यानबाराव... अशी कुणब्याच्या जीवनावर आधारित कवितेतून कवी महेश मोरे यांनी आजचे वास्तव मांडले.
नांदेड जिल्हा शासकीय ग्रंथालयाकडून आयोजित ग्रंथोत्सवातील कविसंमेलनात कविंनी एकापेक्षा एक कविता सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.
कवियित्री सारिका बकवाड यांनी समाजातील काही पुरूषी समाज बाईलेकींना उन्माद वृत्तीतून पाहत आहे, अमानुष अत्याचारी विकृतीतून स्त्री बळी ठरत आहे, अशी मन सुन्न करणारी कविता सादर केली. यामुळे श्रोते गंभीर झाले होते. तर शिवारात गातो बघा गाणं शिवाराचं, गायीगुरं गोतावळा लेणं शिवाराचं... पावसानं दिला दगा ओस ही खाचर गाभडल्या शिवारात घायाळ पाखरं ही शब्दांची मांडणी ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले यांनी केली़ यमदुत भोवताली असतात धाक पर्जत धमकी नको यमा रे, चल उघड दार येतो, ही गझल प्रसिद्ध गझलकार बापू दासरी यांनी सादर करून वाहवा मिळविली़ सगळ्याच शहराला आता डिजिटल बॅनरची बाधा झाली काय? कळत नाही़ पीक का आलं हे जोमानं, का फडफडू लागल्या आहेत खोट्या पताक्या वाऱ्याने... कुणाचे वाढदिवस तर कुणाचे सत्कार, कुणाचे पक्षांतर तर कुणाचे सत्तांतर ही बॅनरबाजी शहराच्या विद्रूपीकरणावरची कविता देवीदास फुलारी यांनी सादर केली.
प्रवृत्तीवर टीका करणारी जगणाºयाची जात पहा, मरणाºयाची जात पहा ही कविता देवदत्त साने यांनी तर ग्रंथसंगती या ग्रंथाचे विवेचन मांडणारी कविता सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी सादर केली.
कवी माधव चुकेवाड, शंकर वाडेवाले, प्रा. अशोककुमार दवणे, डॉ. भगवान अंजनीकर, पांडुरंग तुपेवाड, सदानंद सपकाळ, देवीदास फुलारी, बापू दासरी, डॉ. अमृत तेलंग, शं. ल. नाईक, विजया गायकवाड, बालाजी पेठे, शंभुनाथ कहाळेकर, आत्माराम राजेगोरे, लता शिंदे, विठ्ठल जोंधळे, अशोक कुबडे यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमास मराठवाड्यातील रसिक, वाचक व नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन देवदत्त साने यांनी केले. यशस्वीतेसाठी आशिष ढोक, प्रताप सूर्यवंशी, संजय कर्वे, राजेंद्र हंबिरे, निर्मलकुमार सूर्यवंशी, संजय पाटील, गजानन कळके, शिवाजी पवार, दिनेश लासरवार, यशवंत राजेगोरे, बी. जी. देशमुख, कुबेर राठोड, विठ्ठल काळे, त्र्यंबक चव्हाण, कोंडिबा काठेवाड आदींनी परिश्रम घेतले.
राजकारणात महा बाप पुरा पुरा कंगाल झाला़ पानं सगळी गळून गेली, वाळलं उभं झाड झालाग़ावातली पोरंसोरं लीडर त्याले म्हणायचे, दस्ती टाकून गळ्यामंदी मागंपुढं हिंडायचे़ मागंपुढं माणसं पाहून बाप महा फुगायचा़ होतं नव्हतं वावर इकून रोज कोंबडं कापायचा़ सामान्य माणसाची राजकारणाची स्थिती मांडणारी व-हाडी भाषेची किनार असलेली कविता अशोक कुबडे यांनी सादर केली़