६६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:51 AM2018-11-17T00:51:27+5:302018-11-17T00:52:54+5:30
त्यानंतर घेतलेली लेखी परिक्षा रद्द करुन नव्याने परिक्षा घेण्यात आली होती़ दुसºयांदा झालेल्या लेखी परिक्षेच्या निकालानंतर ६६ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काढले़ शुक्रवारी हे सर्व उमेदवार पोलिस मुख्यालयात हजर झाले होते़
नांदेड : नांदेडात घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठा घोळ झाला होता़ घोटाळ्याचे हे रॅकेट राज्यभर पसरले असल्याचे उघडकीस आले होते़ त्यानंतर घेतलेली लेखी परिक्षा रद्द करुन नव्याने परिक्षा घेण्यात आली होती़ दुसºयांदा झालेल्या लेखी परिक्षेच्या निकालानंतर ६६ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काढले़ शुक्रवारी हे सर्व उमेदवार पोलिस मुख्यालयात हजर झाले होते़
२०१८ मध्ये नांदेडात पोलिस भरती घेण्यात आली होती़ १३ हजारांहून अधिक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले होते़ पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली ही भरती घेण्यात आली़ परंतु पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत काही तरी गैरप्रकार झाला असल्याचा संशय मीणा यांना आला होता़ यावेळी त्यांनी काही उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता, अनेक जणांना एकसमान गुण असल्याचे लक्षात आले़ तसेच अत्यंत अवघड असलेली उत्तरेही अनेक उमेदवारांनी सोडविली होती़ त्यानंतर मीणा यांनी या उमेदवारांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलाविले़ यापैकी काही जणांना उत्तरपत्रिकेतील उत्तराबाबत विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही आणि त्यामुळेच या प्रकरणाचे बिंग फुटले़ या प्रकरणात उत्तर पत्रिका तपासणीचे काम करणाºयासंह अनेक उमेदवारांवर गुन्हा नोंदविण्यात आला़ त्यानंतर या प्रकरणाचा राज्यभर व्याप असल्याचे उघडकीस आले़ पोलिस महासंचालक कार्यालयाने नांदेडात घेण्यात आलेली लेखी परीक्षाच रद्द केली़ त्यानंतर नव्याने लेखी परीक्षा घेण्यात आली़ त्या परीक्षेच्या निकालानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ६६ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले़ त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील १५, ओबीसी-२९, अनुसूचित जाती-६, अनुसूचित जमाती-५, एनटीसी-४ आणि अनुकंपा ७ अशा एकुण ६६ उमेदवारांचा समावेश आहे़ नियुक्त झालेले हे सर्व ६६ उमेदवार शुक्रवारी पोलीस मुख्यालयात हजर झाले होते़