सेंद्रिय शेतीसाठी इंगोले यांना शासनाचा कृषिभूषण तर दत्ता कदम यांना शेतीनिष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:17 AM2021-04-02T04:17:42+5:302021-04-02T04:17:42+5:30
रासायनिक खते व औषधांचा वापर न करता शेतीला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या निविष्ठा आपल्याच शेतावर करून चांगले उत्पादन काढता येते ...
रासायनिक खते व औषधांचा वापर न करता शेतीला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या निविष्ठा आपल्याच शेतावर करून चांगले उत्पादन काढता येते ही भगवान इंगोले यांनी सिध्द केले. त्यांच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन सेंद्रिय शेतीचा कृषिभूषण पुरस्कार जाहीर केल्याने शेतकरी वर्गातून त्यांचे स्वागत होत आहे. काही वर्षांपासून रासायनिक खते व औषधांचा वापर पूर्णपणे बंद करून भगवान इंगोले यांनी आपल्या शेतालाच एक प्रकारची प्रयोगशाळा तयार केली शेतीसाठी लागणा-या सर्व प्रकारचे निविष्ठा, औषधी, बियाणे, खते तयार करून चांगले उत्पादन काढले व शेतीचा पोतही सुधारला, शेती व नागरिकांच्या आरोग्यासाठी विषमुक्त अन्न ही काळाची गरज आहे, याबाबत भगवान इंगोले यांनी केलेला प्रचार व प्रसारही वाखाणण्याजोगा असल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली. तसेच युवा शेतकरी दत्तात्रय नामदेव कदम यांची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड झाली.
जिल्हा कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळेच शक्य - भगवान इंगोले
जिल्हा कृषी अधीक्षक शिवशंकर चलवदे,उपविभागीय कृषी अधिकारी सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून आम्ही एकत्रित काम करीत आहोत. कृषी विभागाचे वेळोवळी मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना सहकार्य होत आहे.