डॉक्टरांच्या हाती कुंचला! नेहरु सेंटर कला दालनात ११ डिसेंबरपर्यंत समूह कला प्रदर्शनाचे आयोजन

By स्नेहा मोरे | Published: December 6, 2023 06:05 PM2023-12-06T18:05:47+5:302023-12-06T18:06:01+5:30

दीपकला फाऊंडेशन आयोजित या प्रदर्शनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि इंग्लंड येथील प्रसिद्ध ५० डॉक्टरांचा समावेश आहे.

Organized group art exhibition till December 11 at Nehru Center Art Hall | डॉक्टरांच्या हाती कुंचला! नेहरु सेंटर कला दालनात ११ डिसेंबरपर्यंत समूह कला प्रदर्शनाचे आयोजन

डॉक्टरांच्या हाती कुंचला! नेहरु सेंटर कला दालनात ११ डिसेंबरपर्यंत समूह कला प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई - आरोग्यदूत म्हणून रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या मात्र दुसरीकडे आपल्या कलेचीही कास धरणाऱ्या काही खास कलाकारांचे विशेष समूह प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. वरळी येथील नेहरु सेंटर आर्ट कला कला दालनात ११ डिसेंबरपर्यंत डॉक्टर्स आर्ट शो हे प्रदर्शन कला रसिकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले आहे.

दीपकला फाऊंडेशन आयोजित या प्रदर्शनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि इंग्लंड येथील प्रसिद्ध ५० डॉक्टरांचा समावेश आहे. टेथस्कोप हाती असणाऱ्या डॉक्टरांनी या प्रदर्शनात कलाकृती सादर करुन कला आणि विज्ञान यांचा अनोखा संगम रसिकांसमोर उलगडला आहे. या प्रदर्शनात डॉ. शेखर भोजराज, डॉ. विनोद इंगळहलीकर, डॉ. सोनल शाह, डॉ, सोनाली सराफ, डॉ. मिनू आचरेकर, डॉ. प्रीतम साळवी, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. डायना गाला, डॉ. विजय पिसाट, डॉ. किशोर बाटवे, डॉ. व्योमिका जशनानी, डॉ. निराली मकनी, डॉ. दत्ताराम कोळी, डॉ. तन्वी महेंद्रकर, डॉ. फिरदौस शेख, डॉ. मृणालिनी वाकचौरे, डॉ. ध्रुवी जैन, डॉ. तन्वी दावडा, डॉ. शीतल मिस्त्री, डॉ. कंनुप्रिया हलन, डॉ. प्रकाश बोरा, डॉ. पूजा मेंधे, डॉ. ऐश्वर्या कुमार, डॉ. मिलन सिंग ठोमर यांच्यासहित अनेक डॉक्टर्स सहभागी झाले असून त्यांची चित्रकला व फोटोग्राफी पाहायला मिळणार आहे.

प्रदर्शनात गडद रंग आणि खोली यांचा वापरकरून आभास निर्माण करणाऱ्या कलाकृती सादर केल्या आहेत. तर दुसरीकडे काही कलाकृतींत निसर्गसौंदर्य व्यक्त करण्यासाठी चित्रकलेचा आधार घेतला आहे. छायाचित्रांमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि प्रखरता यांच्या माध्यमातून सुंदर कलाविष्कार कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे. समकालीन आणि आणि प्राचीन कालावधीत निसर्गाचे रंग प्रवाहीत झाल्यावर साकारल्या जाणाऱ्या कलाकृती कलारसिकांना भावणाऱ्या आहेत.

Web Title: Organized group art exhibition till December 11 at Nehru Center Art Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.