नांदेड जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 02:42 PM2021-01-14T14:42:24+5:302021-01-14T14:42:52+5:30
bird flu in Nanded माहूर तालुक्यातील पपुलवाडी आणि कंधार तालुक्यातील नावद्याची वाडी येथील मृत कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे स्पष्ट
नांदेड- शेजारील परभणी, लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लू ने थैमान घातले आहे. यातच नांदेडमध्ये अनेक ठिकाणी अचानक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने पाठविलेल्या नमुन्यांचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून माहूर आणि कंधार तालुक्यातील दोन ठिकाणचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात 'बर्ड फ्ल्यू'ने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.
परभणी आणि लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लू मुले शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणी तपासणी केली असता बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या ठिकाणी कोंबड्यांना मारण्यात आले होते. नांदेडमध्ये हिमायतनगर तालुक्यातील चिंचोरडी, किनवट तालुक्यातील झळकवाडी येथे कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने कोंबडी, कावळे आणि बदकांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. गुरुवारी त्यातील माहूर तालुक्यातील पपुलवाडी आणि कंधार तालुक्यातील नावद्याची वाडी येथील मृत कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आता या दोन गावात प्रवेश बंदी करून कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत.