नांदेडला़ दिव्यांगांचे बँकेसमोर उद्रेक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:57 PM2018-01-08T23:57:10+5:302018-01-08T23:57:12+5:30
दिव्यांगांसाठी शासन विविध योजना राबवित असताना बँकांकडून मात्र दिव्यांगांची नेहमी हेटाळणी केली जाते़ बँकेकडून स्वयंरोजगारासाठी त्यांना कर्जही दिले जात नाही़ या विरोधात दिव्यांगांनी सोमवारी शिवाजीनगर भागातील एसबीएच बँकसमोरे उद्रेक आंदोलन केले़ यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थित होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दिव्यांगांसाठी शासन विविध योजना राबवित असताना बँकांकडून मात्र दिव्यांगांची नेहमी हेटाळणी केली जाते़ बँकेकडून स्वयंरोजगारासाठी त्यांना कर्जही दिले जात नाही़ या विरोधात दिव्यांगांनी सोमवारी शिवाजीनगर भागातील एसबीएच बँकसमोरे उद्रेक आंदोलन केले़ यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थित होते़
महापालिकेच्या बजेटमध्ये दिव्यांगांसाठी तीन टक्के राखीव निधी ठेवावा आणि तो दिव्यांगांवर खर्च करण्यात यासाठी दिव्यांग संघटनेच्या वतीने लढा सुरु आहे़ त्यात महापालिकेने मोजक्याच दिव्यांगांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे़ तर उर्वरित दिव्यांगांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी बँकेकडून खोडा घालण्यात येत असल्याचा आरोप दिव्यांगांकडून करण्यात आला़ गेल्या चार महिन्यांपासून दिव्यांगांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली नाही़ बँकांकडून दिव्यांगांचे शासन निर्णय असलेले बीजभांडवलाचे प्रस्ताव मंजूर करण्यात येत नाहीत़ दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी बँकेकडून कर्जही उपलब्ध करुन दिले जात नाही़
मनपा प्रशासन आणि बँकेकडून नेहमी होणाºया हेटाळणीच्या विरोधात सोमवारी दिव्यांगांनी बँकेसमोर उद्रेक आंदोलन करुन आपला संताप व्यक्त केला़