तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव, तुरीवर जात आहेत वाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:18 AM2020-12-06T04:18:56+5:302020-12-06T04:18:56+5:30
यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस ...
यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी सर्वच पीक हातचे गेले. कडाक्याच्या थंडीत तूर पीक बहरले होते. उत्पादन चांगले होईल, अतिपावसाने झालेली नुकसान तूर भरून काढेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगून होता. मात्र, अचानक मर रोगाचा प्रादुर्भाव हिमायतनगर तालुक्यातील सर्वच भागात झाल्याने उभी तूर वाळून जात आहे. या रोगावर सध्या उपायोजना होत नसल्याने चांगल्या स्थितीत तुरीचे पीक आले असताना मर रोगामुळे हिरावून नेत आहे. यंदा खरिपातील सर्वच पिकांनी दगाफाटा दिल्याने पेरणी खर्च सुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
कृषी क्षेत्रातील जानकारांच्या मते मर रोग फुले येण्यापूर्वीच आला तर १०० टक्के नुकसान होते, तसेच शेंगा झाडावर पक्व होत असताना रोग आल्यास उत्पादनात ३० टक्के घट होत असते. आजघडीला तूर पीक फुलोरा व कोवळ्या शेंगा धारणेच्या मोसमात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.