नांदेड येथे आॅम्पिकपूर्व चाचणीत धावले 3 हजार धावपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:01 PM2018-01-25T14:01:00+5:302018-01-25T14:09:13+5:30
जपानमधील टोकियोत २०२० मध्ये होणार्या आॅलिम्पिक स्पर्धेत भारतातील धावपटूंनी चमकदार कामगिरी करावी या उद्देशाने एनवायसीएस व केंद्र सरकारच्या पुढाकाराने मराठवाड्यातील धावपटूंची २४ जानेवारी येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर चाचणी स्पर्धा पार पडली़ यात मराठवाड्यासह अमरावती, पुणे व अन्य ठिकाणाहून सुमारे तीन हजार धावपटूंनी सहभाग घेतला़
नांदेड : जपानमधील टोकियोत २०२० मध्ये होणार्या आॅलिम्पिक स्पर्धेत भारतातील धावपटूंनी चमकदार कामगिरी करावी या उद्देशाने एनवायसीएस व केंद्र सरकारच्या पुढाकाराने मराठवाड्यातील धावपटूंची २४ जानेवारी येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर चाचणी स्पर्धा पार पडली़ यात मराठवाड्यासह अमरावती, पुणे व अन्य ठिकाणाहून सुमारे तीन हजार धावपटूंनी सहभाग घेतला़
बुधवारी सकाळी ९ वाजता यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर सावरपाडा एक्स्पेस म्हणून ओळखल्या जाणार्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मधुबाला साबू, जिल्हा क्रीडाधिकारी गंगालाल यादव, प्राचार्य जाधव, राजेश आढाव, अनिल वाघ, मंगेश बेडखळे, शिक्षणाधिकारी बळवंत जोशी, राजे खंडेराय देशमुख, अनिरुद्ध शिरसाठ, विक्रांत खेडकर, भगवान नागरगोजे, प्रलोभ कुलकर्णी यांची उपस्थिती होती़ १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या चाचणीत ११ ते १४ व १५ ते १७ वयोगटातील धावपटूंनी सहभाग घेतला़ निवड चाचणीत औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या आठ जिल्ह्यांसह पुणे, अमरावतीहूनदेखील धावपटूंनी सहभाग घेतला़. जवळपास साडे तीन हजारांहून अधिक धावपटू यात सहभागी झाले होते़
या निवड चाचणीच्या यशस्वीतेसाठी कविता शिरसाठ, दीपाली खेडकर, रमेश बोबडे, पीयूष वाटेगावकर, विष्णू पूर्णे, राम भालके, बालाजी नागपुरे आदींनी प्रयत्न केले. संचालन पूजा शिराढोणकर, प्रास्ताविक राजेश आढाव व आभारप्रदर्शन विक्रांत खेडकर यांनी केले़ या निवड चाचणीस सनतकुमार महाजन, डॉ.दि.भा.जोशी, डॉ. अर्जुन मापारे, बाळासाहेब देशमुख शेंबोलीकर, प्राचार्य संजय पाटील शेळगावकर, सुहास पाटील टाकळीकर, योगेश अंबुलगेकर, धनराज शिरोळे, सुदर्शन यादव, शिवकुमार पत्रे, कृष्णा उदावंत, गंगाधर कोलमवार, गोगे शिवा यांनी भेट दिली़
सहभागींनी आॅलिम्पिकपर्यंत धडक मारावी
मी आश्रमशाळेतून आज मोठी मजल मारली आहे़ जागतिक पातळीवर धावपटू म्हणून नावलौकिक मिळविताना अनेक प्रकारच्या कष्टाला सामोरे जावे लागले, असा अनुभव कविता राऊत यांनी सांगितला़ तसेच या निवड चाचणीत सहभागी खेळाडूंनीही या स्पर्धेत सहभागी होऊन आॅलिम्पिकपर्यंत धडक मारावी अशी अपेक्षा व्यक्त केली़