तेरा तालुक्यांच्या ठिकाणी उभारणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:17+5:302021-04-17T04:17:17+5:30
मालेगाव समवेत भोकर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले जाईल. या ठिकाणी प्रत्येकी ३० बेडची सुविधा ...
मालेगाव समवेत भोकर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले जाईल. या ठिकाणी प्रत्येकी ३० बेडची सुविधा उपलब्ध आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या मालेगाव येथील सेंटरमधील ३० खाटांना ऑक्सिजनची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.
चौकट.............
ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध
जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण लक्षात घेता ऑक्सिजनसाठी वेळेवर धावपळ होऊ नये, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले. आजच्या घडीला जिल्ह्यातील एकूण मागणी २८ ते ३० टनाची आहे. आपल्याकडे सद्य:स्थितीत ३९ टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. रोज मागणीप्रमाणे ऑक्सिजन पोहचत असून धास्तीचे कारण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिली. एकूण ९३ केएल स्टोरेजची क्षमता आहे. या व्यतिरिक्त १३ टन रोज उत्पादन क्षमता असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली.