लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:09+5:302021-07-29T04:19:09+5:30

कोरोनावर लस हाच प्रभावी उपचार आहे. लसीकरणासाठी केंद्रावर गेल्यानंतर लस नसल्याचे सांगितले जात आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑफलाईन रजिस्ट्रेशनचेही ...

The pace of vaccination; It can take up to two years for everyone to get both doses! | लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे !

लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे !

Next

कोरोनावर लस हाच प्रभावी उपचार आहे. लसीकरणासाठी केंद्रावर गेल्यानंतर लस नसल्याचे सांगितले जात आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑफलाईन रजिस्ट्रेशनचेही बंधन घातले जात आहे. केंद्रावर जाऊनही कोरोनाची लस मिळत नाही.

- शुद्धोधन कापसीकर

लसीकरणाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे लसीकरणासाठी भीती वाटत होती. मात्र आता लसीकरणाचे महत्त्व कळाल्यानंतर केंद्रावर पोहोचलो. मात्र आता लस कमी असल्याचे सांगितले जात आहे. ती मिळत नाही.

- रोहित सरपाते

कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण उपयुक्त ठरत असल्याचे जगभरात सिद्ध झाले आहे. त्याच अनुषंगाने लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरुणाईकडून लसीकरणाला अपेक्षित असलेला प्रतिसाद मिळाला नाही. आजारी, ज्येष्ठ नागरिक, महिलांमध्येही लसीकरणाची भीती अद्यापही कायम आहे. त्यामुळे लसीकरणाला अद्याप म्हणावा तसा वेग आला नाही.

तरुणाईचा प्रतिसाद नाही

n १८ वर्षापासून ४४ वर्षापर्यंत नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला. केंद्र सरकारने याबाबतची घोषणा केली. परंतु लसीकरणाला तरुणाईकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अद्यापही तरुण वयोगट लसीकरणासाठी केंद्रावर अपेक्षेप्रमाणे पोहचला नाही.

n जिल्ह्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ७१ हजार २४७ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ १५ हजार ९१२ इतकी आहे.

दहा केंद्रांत सुरू आहे लसीकरण

जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाकडून केले जात आहे. १०२ केंद्रावर लस देण्याची व्यवस्था आहे. परंतु लसीचा तुटवडा असल्याने आजघडीला ७५ केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ७९ हजार २०८ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यासाठी ७ लाख ९९ हजार ६७० कोरोना प्रतिबंधात्मक लस प्राप्त झाल्या आहेत.

Web Title: The pace of vaccination; It can take up to two years for everyone to get both doses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.