पाेलिसांनाे, खाकी वर्दी हाच सर्वात माेठा दागिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:44+5:302021-08-12T04:22:44+5:30

निमित्त हाेते एका सहाय्यक पाेलीस निरीक्षकाच्या पेशाचे. साेमवारी महानिरीक्षकांनी या सहाय्यक निरीक्षकाला आपल्या कक्षात बाेलावले हाेते. हे एपीआय विमानतळ ...

To the Paelis, khaki uniforms are the most beautiful ornaments | पाेलिसांनाे, खाकी वर्दी हाच सर्वात माेठा दागिना

पाेलिसांनाे, खाकी वर्दी हाच सर्वात माेठा दागिना

Next

निमित्त हाेते एका सहाय्यक पाेलीस निरीक्षकाच्या पेशाचे. साेमवारी महानिरीक्षकांनी या सहाय्यक निरीक्षकाला आपल्या कक्षात बाेलावले हाेते. हे एपीआय विमानतळ पेालीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या विराेधात आलेल्या एका बातमीच्या अनुषंगाने महानिरीक्षकांनी त्यांना जाब विचारला. त्यावेळी लाॅकडाऊन काळात आपल्याला लाठी मारल्याचा पत्रकाराचा झालेला गैरसमज व त्यातून जाणीवपूर्वक ही बातमी आल्याचे एपीआयने सांगितले. यावेळी त्या एपीआयच्या हाताच्यो बोटातील माेठी साेन्याची अंगठी व गळ्यातील चेन पाहून महानिरीक्षकांनी त्यांना ‘वर्दी हाच सर्वात माेठा दागिना’ असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांमध्ये जाताना आपणही सामान्यच दिसलाे पाहिजे, अंगावर साेने घालून प्रदर्शनाची गरज नाही, असा सल्ला दिला.

कायदा व सुव्यवस्था राखताना पाेलिसांनी सामान्य नागरिकांशी साैजन्याने वागणे अपेक्षित आहे. पाेलीस ठाण्यात गेल्यावर आपल्याला न्याय मिळेलच, असा विश्वास पाेलिसांनी सामान्यांच्या नजरेत आपल्या वागणुकीतून निर्माण करण्याची गरज असल्याचेही महानिरीक्षक निसार तांबाेळी यांनी यावेळी सांगितले.

चाैकट....

‘सॅल्यूट’बाबत समज

महानिरीक्षकांच्या कक्षात दाखल झालेल्या त्या एपीआयला महानिरीक्षकांनी शिस्तीबाबतही समज दिली. विश्राममध्ये असताना सॅल्यूट कसा काय मारता, असा जाब विचारताना यापूर्वीही तुम्हाला याबाबत सूचना दिली हाेती, याचे स्मरण महानिरीक्षकांनी या एपीआयला करून दिले.

Web Title: To the Paelis, khaki uniforms are the most beautiful ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.