वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ९५ लाखांचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:34+5:302021-07-19T04:13:34+5:30
शासन निर्णयानुसार शासन ज्याप्रमाणे निर्णय घेईल त्यानुसार बस सोडण्याचे आम्ही नियोजन करू. सध्यातरी आषाढी यात्रेच्या अनुषंगाने विशेष असे नियोजन ...
शासन निर्णयानुसार
शासन ज्याप्रमाणे निर्णय घेईल त्यानुसार बस सोडण्याचे आम्ही नियोजन करू. सध्यातरी आषाढी यात्रेच्या अनुषंगाने विशेष असे नियोजन करण्यात आलेले नाही. शासन निर्णयांची प्रतीक्षा आहे.
- वर्षा येरेकर, आगार प्रमुख, नांदेड
वारकऱ्यांचा हिरमोड
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नाही. त्यामुळे वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. अनेक जण एकादशीच्या अगोदर जाऊन दर्शन घेऊन येण्याचे नियोजन करीत आहेत, तर काही जणांनी पंढरी गाठली आहे.
१९९२ पासून एकही वारी चुकली नाही; परंतु कोरोनामुळे यंदाचे दुसरे वर्ष आहे, वारीत न जाता विठ्ठलाचे घरीच नामस्मरण करावे लागते. बा विठ्ठल या संकटातून देश वाचवील. - प्रा. डाॅ. विजय भोसले
वारीतील सातत्य ही आमच्या घराची परंपरा राहिली आहे; परंतु कोरोनामुळे खंड पडला आहे. वारी बंद झाली तरी गावात आषाढी एकादशीनिमित्त उत्साहाने कार्यक्रम घेतला जातो. - नीलेश जोगदंड, निळा
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नाही. याचा फटका वारकऱ्यांना बसला आहे. राज्यातून जाणाऱ्या ७ मानकरी पालख्यांसह इतर ४, अशा ११ पालख्यांना बसने परवानगी देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातून दरवर्षी ७५ लहान-मोठ्या पालख्या जातात; परंतु यंदादेखील कोरोनामुळे साेलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्याने पौर्णिमेपूर्वी आणि नंतर दर्शन घेऊन येत आहेत.
- ह.भ.प. शिवाजी महाराज