वनरक्षकांत दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:00+5:302021-03-15T04:17:00+5:30
आरोपी सापडेनात नांदेड - नगिनाघाट परिसरात निहंगबाबाजी यांची हत्या करून पसार झालेले मारेकरी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. जुन्या ...
आरोपी सापडेनात
नांदेड - नगिनाघाट परिसरात निहंगबाबाजी यांची हत्या करून पसार झालेले मारेकरी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. जुन्या वादाच्या कारणावरून बाबाजी यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असून दोन्ही मारेकरी अद्यापही पसार आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तैनात केली आहेत.
नांदेड येथे महिला दिन
नांदेड- सीए संघटनेच्या नांदेड ब्रँचमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शारदा मांडवेकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शाखाध्यक्ष विजय वट्टमवार होते. यावेळी मयूर अग्रवाल, आनंद काबरा, कुणाल मालपाणी आदींचीही प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रियंका लढ्ढा हिने तर पाहुण्यांचा परिचय साक्षी लाहोटी हिने केला.
दत्त मंदिरात महाशिवरात्री
नांदेड- नल्लागुटा चाळ येथील श्रीदत्त गुरू मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील-चिखलीकर यांच्यासह मंदिर समितीचे अभिजित पाटील-आंडगेकर, श्रीकांत कुलकर्णी, प्रलोभ कुलकर्णी, गंगाधर जामकर, अमृता क्षीरसागर, सुकेशनी जामकर आदी उपस्थित होते.
महिलांचा सत्कार
नांदेड- नांदेड चाइल्ड लाइन कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संगीता कांबळे यांनी केले. यावेळी दीपिका नाथानी, चाइल्ड लाइनचे अध्यक्ष पी.डी. जोशी-पाटोदेकर आदी उपस्थित होते. महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या मुलांना महिलांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन शिकवावा, असे आवाहन पाटोदेकर यांनी केले.
भाजी विक्रेत्यास मारहाण
नांदेड- शहरातील भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत एका भाजीपाला विक्री करणाऱ्या महिला व तिच्या सासूला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. बाजारात जागेच्या कारणावरून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले.
नांदेड शहर अंधारातच
नांदेड- महावितरण वीजकंपनीची १० कोटी ५४ लाखांची थकबाकी महानगरपालिकेकडे थकीत असल्याने महावितरणने शहरातील ७७१ कनेक्शन बंद केल्याने शहर अंधारात बुडाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील प्रमुख मार्गांवरील पथदिवेही बंद होते. शहर अंधारात बुडाल्याने चोरीचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी नागरिकांतून केल्या जात आहेत.