पनवेल, जबलपूर गाडीच्या फेऱ्यांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:51 AM2018-06-23T00:51:49+5:302018-06-23T00:52:19+5:30
दक्षिण मध्य रेल्वेकडून चालविण्यात येत असलेल्या नांदेड ते पनवेल विशेष गाडी आणि सिकंदराबाद ते जबलपूर मार्गे नांदेड विशेष गाडीच्या फे-यांमध्ये वाढ करण्यात येणार असून एकूण ३० फे-या घेण्याच्या निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेकडून चालविण्यात येत असलेल्या नांदेड ते पनवेल विशेष गाडी आणि सिकंदराबाद ते जबलपूर मार्गे नांदेड विशेष गाडीच्या फे-यांमध्ये वाढ करण्यात येणार असून एकूण ३० फे-या घेण्याच्या निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभगातून अनेक विशेष गाड्या चालविल्या जातात़ परंतु, बहुतांश गाड्या प्रतिसादाअभावी बंद केल्या जातात़ दरम्यान, नांदेड - पनवेल- नांदेड आणि सिकंदराबाद येथून नांदेडमार्गे जबलपूर गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर गाड्यांच्या फेºयांमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ नांदेड येथून पुणे आणि पनवेलला जाण्यासाठी विशेष ४ फेºया वाढविण्यात आल्या आहेत़ यामध्ये गाडी संख्या०७६१७ नांदेड ते पनवेल विशेष गाडी नांदेड येथून ४ आणि ११ आॅगस्ट रोजी शनिवारी सायंकाळी ५़ ३० वाजता सुटेल आणि परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद , पुणे मार्गे पनवेल येथे दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता पोहोचेल. तर गाडी संख्या ०७६१८ पनवेल ते नांदेड विशेष गाडी पनवेल येथून ५ आणि १२ आॅगस्ट २०१८ रोजी रविवारी सकाळी १० वाजता सुटेल आणि पुणे, उस्मानाबाद, लातूर, परळी, परभणी मार्गे नांदेड येथे दुसºया दिवशी सकाळी ५ वाजता पोहोचेल. नांदेड येथून जबलपूर आणि सिकंदराबादला जाण्यासाठी विशेष गाडीच्या २६ फेºया वाढविण्यात आल्या आहेत़
गाडी संख्या ०१७०३ सिकंदराबाद ते जबलपूर परतीच्या प्रवासात सिकंदराबाद येथून ३, १०, १७, २४, ३१ जुलै रोजी तर ७, १४, २१, २८ आॅगस्ट आणि ४, ११, १८, २५ सप्टेंबरला धावेल. सिकंदराबाद येथून दर मंगळवारी रात्री ८़३० वाजता सुटेल तर जबलपूर येथे सायंकाळी पोहचेल.
---
गाडीचे वेळापत्रक : प्रवाशांना दिलासा
यामध्ये गाडी संख्या ०१७०४ जबलपूर ते सिकंदराबाद विशेष गाडी जबलपूर येथून दर सोमवारी रात्री ८ वाजता निघेल. अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड मार्गे दुसºया दिवशी ७ वाजता सिकंदराबादला पोहोचेल. ही गाडी जबलपूर येथून दिनांक जुलै महिन्यात २, ९, १६, २३, ३० तारखेला तर ६, १३, २०, २७ आॅगस्ट आणि ३, १०, १७, २४ सप्टेंबर रोजी धावेल. सदरची गाडी जबलपूर येथून दर सोमवारी रात्री ८ वाजता जबलपूर येथून सुटेल तर सिकंदराबाद येथे मंगळवारी रात्री ७ वाजता पोहोचेल.