पनवेल-नंदीग्राम एक्स्प्रेस पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:38+5:302021-07-02T04:13:38+5:30
दमरेच्या नांदेड विभागातून आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस २ जुलैपासून सुरू होणार आहे. यापूर्वी जनशताब्दी, निजामुद्दीन, बंगलोर, जम्मू तावी, ...
दमरेच्या नांदेड विभागातून आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस २ जुलैपासून सुरू होणार आहे. यापूर्वी जनशताब्दी, निजामुद्दीन, बंगलोर, जम्मू तावी, संत्रागच्ची, जयपूर आदी महत्त्वपूर्ण एक्स्प्रेस सुरू झालेल्या आहेत.
गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पनवेल विशेष गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वेस्थानकावरून १ जुलैपासून सुरू झाली. तसेच गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड विशेष गाडी पनवेल रेल्वेस्थानकावरून २ जुलैपासून नियमित धावेल. मुंबई सी.एस.टी.एम. ते आदिलाबाद नंदीग्राम विशेष एक्स्प्रेस गाडी (०११४१) मुंबई सी.एस.एम.टी. येथून १ जुलैपासून सुरू झाली. त्याचबरोबर आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम विशेष गाडी (०११४२) आदिलाबाद ते मुंबई सी.एस.टी.एम. नंदीग्राम विशेष एक्स्प्रेस येथून २ जुलेपासून धावणार आहे.
गाडी संख्या ०४६९२ अमृतसर ते हुजूर साहिब नांदेड गाडी अमृतसर येथून ५ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता सुटेल आणि जालंधर, लुधियाना, न्यू दिल्ली, झांसी, अकोला, वाशिम, हिंगोली मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.४० वाजता पोहोचेल.
गाडी संख्या ०४६९१ हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर ७ जुलैपासून दुपारी ११.०५ वाजता सुटेल आणि हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे अमृतसर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता पोहोचेल. कोल्हापूर ते नागपूर विशेष एक्स्प्रेस (०१४०४) २ जुलै तर नागपूर ते कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस ३ जुलैपासून नागपूर ते कोल्हापूर अशी धावेल. रामेश्वरम ते ओखा विशेष गाडी (०६७३३) रामेश्वरम येथून २ जुलैपासून ५ नोव्हेंबरपर्यंत नियमित सुरू होत आहे. विशाखापट्टणम ते नांदेड विशेष गाडी (त्रि-साप्ताहिक) विशाखापट्टणम येथून दर मंगळवारी, बुधवारी आणि शनिवारी १० जुलैपासून रात्री ८.०० वाजता सुटून राजमुंद्री, काझीपेत, सिकंदराबाद, निझामाबाद मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.३४ वाजता पोहोचणार आहे. गाडी संख्या ०८५६६ नांदेड ते विशाखापट्टणम विशेष गाडी (त्रि-साप्ताहिक) नांदेड रेल्वेस्थानकावरून दर बुधवारी, गुरुवारी आणि रविवारी ११ जुलैपासून दुपारी ४ .३५ वाजता सुटेल आणि निझामाबाद, सिकंदराबाद, काझीपेत मार्गे विशाखापट्टणम येथे दिवशी सकाळी ०९.१५ वाजता पोहोचेल.