परभणी-मुदखेड दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:17 AM2018-12-24T00:17:33+5:302018-12-24T00:19:16+5:30

परभणी ते मुदखेड या ८१ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर आले आहे. या कामावर मागील तीन वर्षांत २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Parbhani-Mudkhed doubling works on half | परभणी-मुदखेड दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर

परभणी-मुदखेड दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर

Next
ठळक मुद्देकामाला गती मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

नांदेड : परभणी ते मुदखेड या ८१ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर आले आहे. या कामावर मागील तीन वर्षांत २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.मराठवाड्याच्या दळणवळण विकासात महत्त्वाचे पाऊल मनमाड ते मुदखेड दुहेरीकरण ठरणार आहे. मार्च २०१९ अखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे विभागाने ठेवले आहे.
परभणी ते मुदखेड या ८१.४० किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण २०१२-१३ मध्ये मंजूर झाले. याचा अंदाजित खर्च ३९० कोटी ६० लाख रुपये होता. गेल्या तीन वर्षांत यापैकी २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यापैकी एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ यावर्षी ५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. परभणी ते मुदखेड या ८१.४० किलोमीटर मार्गापैकी परभणी ते मिरखेल हा १७ किलोमीटर चा मार्ग जून २०१७ मध्येच पूर्ण होऊन वापरात येत आहे. मुगट ते मुदखेड या ९.३ किलोमीटर या मार्गाचेही दुहेरीकरण पूर्ण होऊन सी.आर.एस.च्या परवानगीने १० आॅक्टोबरपासून वापरात येत आहे. लिंबगाव - नांदेड- मालटेकडी या १४.१० किलोमीटरच्या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे असून १७ आॅक्टोबर २०१८ पासूनच प्रवाशांच्या सोयीकरिता वापरात येत आहे. या मागार्मुळे रेल्वेगाड्यांची गती वाढली आहे.
परभणी ते मुदखेड या ८१.४० किलोमीटर मार्गापैकी ४०.४ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. त्याचवेळी उर्वरित मिरखेल ते लिंबगाव (३०.९० किमी) आणि मालटेकडी ते मुगट (१०.० किमी) या उरलेल्या ४१.०० किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरणाचे काम मार्च -२०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परभणी ते मुदखेड या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण केल्यानंतर मराठवाड्यातील माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. उद्योग व्यवसायामध्येसुद्धा भविष्यात अपेक्षित प्रगती साधता येईल. आजघडीला ३५-४० रेल्वे या एकल मार्गावरून धावतात. दुहेरीकरणानंतर या मार्गावरून रेल्वेगाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या मार्गाच्या दुहरेकरणासोबतच विद्युतीकरणाचे कामही नांदेड विभागात लवकरच सुरु होणार आहे. ते कामही येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुहेरीकरणासाठीच्या प्रमुख बाबी रेल्वे विभागाने जवळपास पूर्ण केल्या आहेत. त्यामध्ये जमीन संपादन, केबल कार्य, मोठे आणि छोटे पुलांचे बांधकाम, रिले रूम्स आणि केबिन, इत्यादी पूर्ण करण्यात आले आहेत. प्रवासी सुविधा जसे- उंच प्लॅटफॉर्म, बेंचेस, पाणी सुविधा इत्यादीचे काम सर्व रेल्वेस्थानकांवर पूर्ण झाले आहे. फक्त काही रेल्वे मार्गाशी संबंधित काही किरकोळ कामे ग्लू ज्योयिंटस , ट्रेक लायनिंग , इत्यादी शिल्लक आहेत . ३ छोटे पूल, एका भुयारी पुलाचे काम सुरू आहे.
प्रधानमंत्री कार्यालयाकडून या कामाच्या प्रगतीकडे लक्ष ठेवल्या जात आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल हेही या मार्गाच्या दुहेरीकरण कामाचा आढावा घेत आहेत.

Web Title: Parbhani-Mudkhed doubling works on half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.