परभणी ते नांदेड अनारक्षित प्रवासी रेल्वे धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:15 AM2021-07-17T04:15:19+5:302021-07-17T04:15:19+5:30
गाडी संख्या ०७६७२ परभणी ते नांदेड सवारी गाडी (अनारक्षित) अगोदर ०७६६५ या क्रमांकाने परभणी ते नांदेडदरम्यान धावणारी सवारी गाडी ...
गाडी संख्या ०७६७२ परभणी ते नांदेड सवारी गाडी (अनारक्षित) अगोदर ०७६६५ या क्रमांकाने परभणी ते नांदेडदरम्यान धावणारी सवारी गाडी १८ जुलैपासून ०७६७२ यानुसार परभणी ते नांदेडदरम्यान सुरू होत आहे. ही गाडी सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. या गाडीच्या वेळा आणि थांबे पूर्वीप्रमाणेच असतील. ही गाडी अनारक्षित असून प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
चौकट
गाडी संख्या ०७६९२ तांडूर ते परभणी एक्स्प्रेस १७ जुलैपासून पूर्वीप्रमाणेच तांडूर ते परभणीदरम्यान धावेल. ही गाडी काही काळ सिकंदराबाद ते तांडूर आणि नांदेड ते परभणीदरम्यान अंशतः रद्द होती. सिकंदराबाद – नांदेड अशी धावत होती. तसेच गाडी संख्या ०७६९१ नांदेड ते तांडूर एक्स्प्रेस १६ जुलैपासून पूर्वीप्रमाणेच नांदेड ते तांडूरदरम्यान धावेल.