प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! शिर्डी, नगरसोल डेम्यू एक्स्प्रेस रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:56 PM2022-06-29T15:56:11+5:302022-06-29T15:56:57+5:30
मेगा ब्लॉकचा फटका नांदेड विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांना बसत आहे.
नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी श्रीसाईनगर शिर्डी, नगरसोल डेम्यू एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनमाड-अंकाईदरम्यान दुहेरीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. सदर कामामुळे घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकचा फटका नांदेड विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांना बसत आहे. यापूर्वी नांदेड विभागातून धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच आता जालना-नगरसोल-जालना आणि जालना-श्रीसाईनगर शिर्डी -जालनादरम्यान धावणाऱ्या डेमू रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यामध्ये जालना येथून सुटणारी गाडी (०७४९१) जालना-श्रीसाईनगर शिर्डी विशेष डेमू एक्स्प्रेस ३० जून रोजी रद्द करण्यात आली आहे. श्री साईनगर शिर्डी येथून सुटणारी गाडी (०७४९२) श्रीसाईनगर शिर्डी -जालना विशेष डेमू एक्स्प्रेस ३० जून रोजी रद्द करण्यात आली आहे. जालना येथून सुटणारी गाडी (०७४९३) जालना- नगरसोल विशेष डेमू एक्स्प्रेस २० जून आणि १ जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे. नगरसोल येथून सुटणारी गाडी (०७४९४) नगरसोल - जालना विशेष डेमू एक्स्प्रेस २९ जून आणि १ जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.