नांदेड-लातूर रस्त्यावर प्रवाशांना मरण यातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:54+5:302020-12-15T04:33:54+5:30
कोट- यंदा नांदेडसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने त्याचा परिणाम रस्त्यावर झाला ...
कोट-
यंदा नांदेडसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने त्याचा परिणाम रस्त्यावर झाला आहे. या रस्ते दुरुस्तीसाठीचे नियोजन बांधकाम विभागाने केले आहे. मात्र यंदा कोविड उपाययोजनामुळे विकास कामांच्या निधीवर परिणाम झाला आहे. याचा फटका बांधकाम विभागाला मिळणार्या निधीलाही बसला आहे. मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यासह पुलांच्या कामासाठी राज्य शासनाने २ हजार ६३५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.त्यातील ५५० कोटी मराठवाड्यातील रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीकरता मिळणार आहेत. चालू असलेल्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात यासाठीच्या तरतुदींना पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी मिळेल. त्यानंतर पुढील दोन महिन्यात मंजुरीसह निविदा प्रक्रिया होऊन रस्त्याची कामे मार्गी लागतील.- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री.