गृह विलगीकरणातील रुग्ण मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:36+5:302021-04-26T04:15:36+5:30
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांमध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. चौदा दिवस घरात राहणे आवश्यक ...
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांमध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. चौदा दिवस घरात राहणे आवश्यक असताना चार ते पाच दिवसच घरी राहून सर्रासपणे बाहेर मुक्त संचार करीत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या लाटेदरम्यान संक्रमित रुग्णांचे संपूर्ण घरच सील होत होते. त्यामुळे कोणत्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती शेजाऱ्यांसह इतरांना मिळत होती. ते संक्रमित रुग्णांपासून तसेच त्यांच्या घरच्या मंडळींपासून दूर राहत होते. पहिल्या लाटेमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने प्रशासकीय यंत्रणा सुद्धा प्रत्येक रुग्णांवर नजर ठेवून होती. त्यामुळे रुग्णांना घराबाहेर भटकता येत नव्हते.
चाैकट......
लोकप्रतिनिधींनी व्हावे जागृत..
शहरात नगरसेवक व इतर ग्रामीण भागात ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या वॉर्डातील अशा बेजबाबदार संक्रमित गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांवर वॉच ठेवावा. असा सल्ला तज्ज्ञ मंडळींनी दिला आहे. असे रुग्ण १४ दिवसांच्या गृहविलगीकरण कालावधीत बेजबाबदारपणे घराबाहेर निघून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करीत असल्याचे दिसून आल्यास प्रशासकीय यंत्रणेला अवगत करणे आवश्यक असल्याची मागणीही सूज्ञ नागरिक करत आहेत.