पवारांना राष्ट्रपतिपद या चर्चेस कुठलाही आधार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:20+5:302021-07-15T04:14:20+5:30
ते म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणुका लढण्याच्या वक्तव्यावर आपल्याला काहीही माहिती नाही. जोपर्यंत आमच्यासमोर विषय आला ...
ते म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणुका लढण्याच्या वक्तव्यावर आपल्याला काहीही माहिती नाही. जोपर्यंत आमच्यासमोर विषय आला नाही, तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असेही मलिक म्हणाले. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनीही आपल्याला हा विषय माहीत नाही. सरकार पाच वर्ष पूर्ण करील. माझ्या माहितीप्रमाणे हा विषय आता संपला आहे, असे सांगितले. तसेच नांदेडातील उर्दू घराला दिवंंगत अभिनेते दिलीपकुमार यांचे नाव देण्याची घोषणा मलिक यांनी केली आहे. त्यांच्या नावाने हे उर्दू घर ओळखले जाईल. दिलीपकुमार यांना देशात आणि जगात आदराचे स्थान होते. त्यांचा नांदेडशीही संबंध राहिला आहे. शंकरराव चव्हाण असताना दिलीपकुमार हे अनेक वेळा नांदेडला आले आहेत. त्यांो नाव अजरामर आहे. एवढी वर्षे सिनेसृष्टीत असताना त्यांचे उर्दू उत्तम होते, असेही चव्हाण म्हणाले.